झी मराठी पुरस्कार सोहळा लवकरच टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना दररोज मालिकेतून भेटायला येणाऱ्या कलाकारांचा सत्कार होतो. तसेच अनेक मनोरंजनात्मक गोष्टी इथे पाहायला मिळतात. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याची देखील जोरदार तयारी चालू झाली आहे. कलाकार देखील या शोसाठी तयारी करत आहेत. अशातच झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील छोट्या परीचा पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून परीचा म्हणजेच मायरा वैकुळचा एक सुंदर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, परीने एक सुंदर जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ती झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आलेली आहे. या व्हिडिओमध्ये परी खूपच गोड दिसत आहे. (Majhi tujhi reshimgath fame Myra vaikul’s video viral on social media)
झी मराठी पुरस्कार सोहळा शनिवारी (३० सप्टेंबर) रोजी झी मराठीवर टेलिकास्ट जाणार आहे. जेव्हापासून या शोचे प्रोमो समोर आले आहेत, तेव्हापासून सगळे प्रेक्षक हा पुरस्कार पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
मायरा सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे हे कलाकार काम करत आहेत. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय तिच्या लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते, ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नवरात्रीच्या आठव्या दिवशी अपूर्वा नेमळेकरने घेतले विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचे रूप
-‘ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’, अभिनेत्रीची सोज्वळता पाहून चाहत्याने ठेवला थेट लग्नाचा प्रस्ताव