Saturday, July 6, 2024

श्रेयस तळपदे अन् प्रार्थना बेहरेच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा लॉन्च सोहळा संपन्न; व्हिडिओ आला समोर

मराठी मालिका या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात झी मराठी या वाहिनीवरील मालिका तर प्रेक्षक आनंदाने पाहत असतात. अशातच सगळ्या प्रेक्षकांसाठी काही दिवसांपूर्वी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे झी मराठीवर पाच नवीन मालिका येत आहेत. झी मराठी ही जुनी वाहिनी आहे. २२ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या वाहिनीला प्रेक्षकांनी अपार प्रेम दिले. प्रत्येक मालिकेला प्रेम दिले आहे.

नुकतेच १५ ऑगस्टला झी मराठी या वाहिनीला २२ वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्त या वाहिनीची नवीन टॅगलाईन देखील समोर आली आहे. ती टॅगलाईन सर्वांना खूप आवडली आहे. ही टॅगलाईन आहे ‘नव्या नात्याच्या बांधू गाठी झी मराठी मी मराठी.’ अशातच अनेक नवीन कुटुंब आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. यातच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचे प्रोमो सर्वांना आवडत आहे. अशातच या मालिकेचा लॉन्च सोहळा पार पडला आहे. याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. (majhi tujhi reshimgath serials lonch function viral on social media)

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या लॉन्च सोहळ्याला प्रार्थना बेहेरे, श्रेयश तळपदे आणि मायरा वैकुळ हजर होते. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर हे देखील उपस्थित होते. या सोहळ्यात सगळ्यांचे स्वागत झाले तसेच सर्वांनी मालिकेतील त्यांच्या पात्राबाबत माहिती सांगितली. तसेच मायरासोबत देखील गप्पा मारल्या. ही मालिका ५ वर्ष चालेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या मालिकेचे प्रोमो जेव्हापासून प्रदर्शित झाले आहेत, तेव्हापासून मायराचे सर्वत्र कौतुक चालले आहे. या मालिकेतील मायराच्या पात्राचे नाव परी असे आहे. प्रार्थनाच्या पात्राचे नाव नेहा तर श्रेयसच्या पात्राचे नाव हर्षवर्धन असे आहे. या मालिकेचे शीर्षक गीत देखील नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्याला देखील प्रेक्षकांचे जबरदस्त प्रेम मिळताना दिसत आहे.

आता ही मालिका पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ही मालिका २३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा