मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे आपल्या अभिनयासोबतच समाजातील होणाऱ्या घडामोडींवर अभिनेत्री आपले परखड मत व्यक्त करत असते. सध्या सर्वत्र मकर संक्रांतीनिमित्त अनेक कालाकारांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच केतकीने देखिल शुभेच्छा दिल्या आहेत मात्र, तिच्या शुभेच्छा देखिल तिच्या वक्तव्यासरख्याच कडू बोल आहेत.
‘अबोली’ मालिकेतून घरघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिला कोणत्याही परिचयाच गरज नाही. नेहमी आपल्या परखड वक्तव्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आज सर्वत्र मकरसंक्रातीचा सण साजरी केला जातो. नवीन वर्षातील पहिला सण मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो.
अशातच केतकीच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. केतकीने पोस्ट शेअर करत लिहिले की, “जे वर्षानुवर्षे मी लिहीत आले आहे तेच आज पुन्हा लिहिते आहे, तिळगुळ खा आणि खोटे गोड गोड न बोलता कडू सत्य बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”

केतकीच्या वक्तव्यासारख्याच तिच्या शुभेच्छा होत्या. यावर काही चाहत्यांनी तिल्या शुभेच्छा दिल्या तर काही नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे. केतकी सतत तिचे फुकटचे सल्ले लोकांपर्यत पोहोचवत असते. ती सतत आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या घेऱ्यात अडकत असते. वर्षाच्या नवीन वर्षातही तिने भिमा कोरेगाव स्तंभाविषयी विधान केलं होतं ज्यामुळे तिला लोकांनी सोशल मीडियावर जाम ट्रोल केलं होतं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांने घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ
VIDEO | मिस युनिवर्सच्या स्टेजवर ढसाढसा रडली हरनाज संधू, पाहा रॅम्प वॉक करताना घडलेला प्रकार