×

गोविंदा आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या ‘मखना’ डान्सची परदेशात हवा, व्हिडिओ होतोय व्हायरल

अभिनेता गोविंदा( Govinda) आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit)  डान्सचे जगभरात चाहते आपल्याला पाहायला मिळतात. ९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने गोविंदाने सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याचप्रमाणे सहजसुंदर अभिनय आणि त्यासोबत लाभलेले घायाळ करणारे सौंदर्य यामुळे माधुरी दीक्षितनेही हिंदी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आजही अनेक कार्यक्रमात त्यांच्या डान्सची झळक प्रेक्षकांना पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक परदेशी तरुणींचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी गोविंदा आणि माधुरीच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केलेला पाहायला मिळत आहे. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

अभिनेता  गोविंदा आणि माधुरी दीक्षित अशा बॉलीवूड स्टार्सपैकी आहेत ज्यांच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले आहे. आजही सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत त्यांच्या डान्सची कॉपी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या ‘मखना’ गाण्यातील त्याचा डान्स तुम्हाला आठवत असेलच, ज्यात माधुरी-गोविंदासोबत अमिताभ बच्चन यांनीही जबरदस्त डान्स केला होता. या ‘मखना’ गाण्यावर काही मुलींच्या डान्सच्या व्हिडिओने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये मुलींसोबत काही मुलंही जबरदस्त थरारताना दिसत आहेत. यूट्यूबवरील हा डान्स व्हिडिओ बीफंक नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन मुली थिरकताना दिसत आहेत. या डान्स व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत 60 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ 3 वर्षांपूर्वी यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये शिवानी भगवान आणि छाया कुमार जबरदस्त डान्स करत आहेत. दोघांच्या डान्सला चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक परदेशी युजर्सनी छाया आणि शिवानीच्या जबरदस्त स्टाइल आणि तहलकाच्या डान्स मूव्ह्सवर कमेंट करून कौतुक केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post