बॉलिवूडमध्ये मलायका अरोरा तिच्या उत्कृष्ट फिटनेस आणि नृत्य कौशल्यांसाठी ओळखली जाते. अनेक चाहते तिचा डान्स पाहिल्यानंतर आपला होश गमावतात. आज मलायकाचा एक असा व्हिडिओ पाहू, ज्यात तिचा डान्स पाहून प्रेक्षक वाह वाह करतच राहिले!
जेव्हा मलायका ‘इंडियाज़ बेस्ट डांसर’ या शोला जज करायची, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. या शोमध्ये मलायकाने ‘पिया तू अब तो आजा’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. तिच्या या डान्सने गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांना सीटवरून उठण्यास भाग पाडले होते. गाण्यावर मलायकाचे डान्स मूव्हज अप्रतिम होते आणि तिच्या एक्सप्रेशनबद्दल तर काय बोलायलाच नको!
तसे, मलायकाने तिच्या कारकीर्दीत आजपर्यंत बऱ्याच गाण्यांवर डान्स केले आहेत. मलायकाने कधीही अभिनयात रस दाखविला नाही किंवा तिला तशी संधीही मिळाली नाही. परंतू ‘छैयां छैयां’ पासून ते ‘मुन्नी बदनाम’पर्यंत तिने एकापेक्षा एक गाण्यांवर जबरदस्त डान्स केला आहे.
आजकाल मलायका अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघेही जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सध्या मलायकाचे वय ४७ वर्ष असून अर्जुनचे वय ३५ वर्ष आहे. मलायकाने यापूर्वी अरबाज खानशी १९९८ साली लग्न केले होते पण २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अरबाज खानचे सध्याचे वय ५३ वर्ष असून तो जॉर्जिया ऍड्रियानी या ३० वर्षीय इटालियन मॉडेलला डेट करत असल्याचे बोलले जातेय.