Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर झाले ते वेगळे; मलायकाने अखेर सांगितले वेगळे होण्याचे कारण

लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर झाले ते वेगळे; मलायकाने अखेर सांगितले वेगळे होण्याचे कारण

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लव्ह मॅरेज केले होते. लग्नाआधी जवळपास ५ वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले होते. परंतु असे असूनही, लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर त्यांचे नाते तुटले आणि त्यांचा घटस्फोट झाला. पण हे नाते बिघडण्यामागे नेमके कारण काय होते, असा प्रश्न नेहमीच त्यांचा चाहत्यांना पडत असतो. यामागे बरेच तर्कही लावले जातात. मात्र यामागचे खरे कारण मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते.

घटस्फोट झाल्यानंतर, जेव्हा मलायका याबद्दल पहिल्यांदाच बोलली होती, तेव्हा तिने सांगितले की, जेव्हा दोन लोक एका नात्यात आनंदी नसतात, तेव्हा ते वेगळे होणेच चांगले असते. त्यावेळी ते दोघेही या नात्यात आनंदी नव्हते. आणि ते आनंदी नसल्याचा परिणाम त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर होऊ लागला होता.

मलायकाचे अरबाज खान सोबतचे नाते तुटल्यानंतर, तिचे नाव अर्जुन कपूरशी जोडले जाऊ लागले. ते दोघे रिलेशनशिप मध्ये आहेत आणि बऱ्याचदा त्यांच्या लग्नाच्या बातम्यादेखील येत असतात. त्याचवेळी अरबाज खानचे नाव देखील परदेशी मॉडेल जॉर्जियासोबत जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत असे समजत आहे आणि तसे या दोघांचे एकत्र फोटोज देखील आपल्याला पाहायला मिळतात.

विशेष म्हणजे, मलायका अरोरा आणि अरबाज खान वेगळे झाले असले, तरीही त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. अरहान खानचे पालक असल्याकारणाने त्यांनी त्यांचे नाते अगदी समजूतदारपणाने हाताळले आहे.

हे देखील वाचा