Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

हातात हात घालून बाहेर फिरताना स्पॉट झाले अर्जुन अन् मलायका, पण अभिनेता टी- शर्टवरून ट्रोल

 

आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये अनेक कपल आपल्याला पाहायला मिळतील. काही अगदी बिनदिक्कतपणे त्यांचे नाते जगासमोर कबूल करताना दिसतात, तर काही नेहमीच त्यांचे नाते मीडियापासून, जगापासून लपवताना दिसतात. यासर्वांमधे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते वेगळेच आहे. हे कपल इतर कपलपेक्षा कसे आणि का वेगळे हे तर सर्वांनाच माहित आहे. पूर्वी आपले नाते मान्य करायला का कु करणारे हे दोघं आता बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसतात.

नुकतेच या दोघांना एका ठिकाणी स्पॉट केले गेले. सोशल मीडियावर या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर ऑल ब्लॅक लुकमध्ये दिसत आहे. त्याच्या टि शर्टवर लिहिलेले दोन शब्द सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या टि शर्टवर ‘Wasted Youth’ हे शब्द लिहिले आहे. नेहमीप्रमाणे तो या लूकमध्ये हँडसम दिसत आहे. तर मलायकाबद्दल सांगायचे झाले तर, तिने व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिम यावर व्हाइट चप्पल घातली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तर अर्जुन आणि मलायका एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अर्जुनने घातलेला टि शर्ट आणि त्यावर लिहिलेले ‘Wasted Youth’ हे दोन शब्द पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अर्जुन आणि मलायकाला पाहून त्यांचे फॅन्स त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. गर्दीतून वाट काढत हे दोघं गाडीजवळ जात आहे.

अर्जुन आणि मलायकाबद्दल सांगायचे झाले तर, मलायकाने १९९८ साली अरबाज खानसोबत लग्न केले, मात्र २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटाआधीच अर्जुन आणि मलायकाच्या नात्यासंदर्भात बातम्या येत होत्या. नेहमी जगापासून आपले नाते लपवणाऱ्या या दोघांनी काही काळाने सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आणि त्यांचे नाते अधिकृत झाले.

अर्जुन कपूरचा नुकताच ‘भू​त पुलिस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात यामी गौतम, जावेद जाफ़री, जॅकलिन फर्नांडिस, सैफ अली खान देखील अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या अर्जुन ‘एक व्हिलन २’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा