बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सतत तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. व्यायाम करतानाचे फोटो व व्हिडिओ शेअर करून ती नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘चक्रासन’ करताना दिसली आहे.
या फोटोमध्ये मलायका ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली आहे. तसेच ती जमिनीवर नव्हे, तर एका भिंतीवर योगा करत आहे. मलायकाला या धोकादायक स्टाईलमध्ये चक्रासन करताना पाहून कोणीही तोंडात बोटे घालेल. म्हणूनच या फोटोवर तिचे चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत आणि अभिनेत्रीची प्रशंसाही करत आहेत. हा फोटो शेअर करताना मलायका अरोराने अरन लॉरित्सन यांचा भलामोठा कोटही टाकला आहे. तसेच, तिच्या या फोटोवर आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.
मलायका अरोराने तिचा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत लिहिले की, “हे जाणून मला एक विचित्र आनंद वाटतो की, आज काहीही झाले तरी उद्या सूर्यास्त होईल. ज्या संघर्षामध्ये आपण आज आहोत, उद्या ते चांगले जुने दिवस बनतील आणि ते आठवून आपण हसू. आयुष्यातील अडचणी आपली परीक्षा घेत असतात आणि भविष्याला आकार देतात. परंतु त्या कारणास्तव, आपण आज जे आहात त्यामध्ये बदल करू नका.” या कॅप्शनसह तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
मलायका अरोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. ती नेहमी अर्जुनसोबत फिरताना दिसते. मलायका अरोराचे पहिले लग्न अरबाज खानशी झाले होते, त्याच्याकडून तिला अरहान खान नावाचा एक मुलगाही आहे. मलायका आणि अरबाजचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कसा दिसतोय मी?’ आपल्या आगामी चित्रपटातील पहिला लूक शेअर करत ‘खिलाडी’ अक्षयचा चाहत्यांना प्रश्न
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा