Sunday, April 14, 2024

स्वत:च्या बहिणीशीच मलायकाने केले कडाक्याचे भांडण; भावूक होऊन म्हणाली, ‘जेव्हा गरज होती तेव्हा तू…’

अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मूव्हिंग इन विथ मलायका‘ हा शो चांगलाच चर्चेत आहे. हा शो आल्यापासून मलायकाने तिच्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. एवढंच नाही, तर या शोमधून मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा यांचे भांडणही समोर आले आहे. या शोमध्ये मलायकाचा मुलगा आणि बहीण अमृताने हजेरी लावली होती. मात्र, यादरम्यान त्यांच्यातील भांडणेही समोर आले. अशात या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये दाखवले आहे की, या बहिणींमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून मोठे भांडण होते. त्या दोघी भांडण मिटवण्यासाठी लंच डेटवर जातात. यादरम्यान त्यांच्यात वेगळ्याच कारणावरून भांडण सुरू होते.

‘मूव्हिंग इन विथ मलायका’ (Mooving In With Malaika) शोच्या नवीन प्रोमोची सुरुवात मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्यापासून होते. ती गोव्यात पोहोचल्यानंतर थेट अमृता अरोरा (Amrita Arora) हिच्या बेडरूममध्ये जाते आणि विचारते की, ती दुर्लक्ष का करत आहे? अमृताही तिचा फोन पाहत राहते आणि मलायकाकडे पाहत म्हणते की, काय? यावेळी तिला विश्वास बसत नाही की, मलायका तिच्याबरोबर असे का बोलत आहे.

अमृता आणि मलायकाचे भांडण
यादरम्यान अभिनेता डीनो मोरिया (Dino Morea) तिथे पोहोचतो आणि मलायका तसेच अमृताला म्हणतो की, त्याला ऍडव्हेंचर आवडते, त्यामुळे ते सर्व कँपिंगसाठी जात आहेत. मलायका लगेच होकार कळवते. यावर अमृता नाराज होते आणि म्हणते की, “एक व्यक्ती बोलत आहे की, चला चला, पण ठीक आहे इथे कुणालाही मी काय विचार करते, याचा फरक पडत नाही.” यानंतर अमृता कँपिंगला जाण्यास नकार देते. तसेच, तिथून उठून जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

‘अमृता गरज होती तेव्हा सोबत नव्हती’
यानंतर मलायका अमृताकडे जाते आणि तिला दु:खी होण्यामागील कारण विचारते. त्यावेळी अमृता सांगते की, तिला पाण्याची खूपच भीती वाटते. त्यानंतर ती म्हणते की, जर ती सोबत गेली, तर नेहमीप्रमाणे एकमेकींसोबत भांडण होईल. यानंतर मलायका आणि अमृता समुद्रकिनारी डान्स करताना आणि बातचीत करताना दिसतात. पुढे मलायका भावूक होते आणि अमृताला विचारते की, “तू एक चांगली आई, पत्नी आणि मैत्रीण आहेस. मात्र, चांगली बहीण कधी बनणार? जेव्हा मला एका बहिणीची जास्त गरज होती, तेव्हा अमृता तिच्या जवळ नव्हती.”

मलायका आणि अमृता यांचा हा प्रोमो व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (malaika arora feud with sister amrita arora gets emotional see video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐश्वर्या शेर, तर लेक सव्वाशेर! उंचीमध्ये थेट आईला टक्कर देतेय आराध्या, व्हिडिओ पाहून उंचावतील भुवया
‘लस्ट स्टोरीज’मध्ये इंटीमेट सीनमुळे घाबरलेली भूमी; म्हणाली, ‘लोकांनी भरलेल्या खोलीत माझ्या शरीरावर…’

हे देखील वाचा