Thursday, January 29, 2026
Home बॉलीवूड मलायका अरोराच्या ‘हॉटशॉट’ फोटोशूटने केला कहर; पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये गजब दिसतेय अभिनेत्री

मलायका अरोराच्या ‘हॉटशॉट’ फोटोशूटने केला कहर; पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये गजब दिसतेय अभिनेत्री

बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा होय. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही हटके आणि आकर्षक शेअर करत असते. ती फिटनेस विषयी स्वतःची प्रचंड काळजी घेते. मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते. अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटवरून तुमची नजरच हटणार नाही. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसली आहे. मलायका सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती अनेकदा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायकाचे चाहते अनेकदा तिच्या फोटोवर कमेंट्स करतात. तिच्या फोटोला प्रचंड लाईक्स मिळतात.

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये मलायकाने जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तिच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने हातात सोन्याची अंगठी घातली आहे आणि आपले केस मोकळे सोडले आहेत. मलायकाने ड्रेसच्या रंगांची मॅचिंग लिपस्टिकही लावली आहे, जी तिच्यावर खूप सुंदर दिसतेय. तिने डोळ्यांवर हलका मेकअप केला आहे. त्यामुळे तिचे डोळे फारच सुंदर दिसत आहे. तिच्या हातात तिने एक डिझायनर ब्रेस्लेट घातले आहे. तिच्या या लूकने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मलायकाने शेअर केलेल्या या फोटोवर युजर्स मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्स मलायकाच्या लूकचे कौतुक करता आहे. तसेच काही चाहते हार्ट ईमोजी शेअर करत आहेत. मलायकाविषयी बोलायचे झाले, तर की बऱ्याच काळापासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सुरुवातीला दोघांनी त्यांचे नाते सर्वांपासून लपले होते. पण नंतर दोघांनी उघडपणे मीडियासमोर आपले प्रेम व्यक्त केले आहे. आता दोघे सहसा एकत्र दिसतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा