Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

मलायका अरोराच्या ‘सोनेरी सौंदर्या’वर चाहते फिदा; ड्रेसमधील पोझला मिळतेय पसंती

बॉलिवूड सर्वात हॉट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि रोज चाहत्यांसाठी काहीतरी शेअर करत राहते. ती फिटनेस विषयी स्वतः ची प्रचंड काळजी घेते. याव्यतिरिक्त ती अनेकवेळा पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद होते, ज्यामुळे ती सतत चर्चेत येत असते. बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत राहते. तिची एक झलक पाहून तिचे चाहते अक्षरश: वेडे होतात. अशात पुन्हा एकदा मलायकाने अलीकडेच तिच्या शानदार स्टाईलमध्ये सोनेरी रंगाचा ड्रेस घालून चाहत्यांना घायाळ केले आहे.

लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मलायकाचे हटके फोटो व्हायरल होत आहेत. मलायकाचे हे फोटो तिच्या स्टायलिश मेनका हरिसिंगानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मलायकाने सोनेरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. हे स्पष्ट फोटोमध्ये दिसून येते. मलायका फोटोमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. आतापर्यंत या फोटोवर हजारो लाईक्सचा वर्षाव झाला आहे. तसेच नेटकरी कमेंटच्या माध्यमातून मलायकाचे कौतुकही करत आहेत. एका चाहत्याने म्हटले आहे की, “ओएमजी, मी आता एका बार्बी डॉलला पाहिले.” दुसऱ्या एकाने “स्टनिंग,” अशी कमेंट केली आहे.

मलायकाने आयटम साँग करून बॉलिवूडमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिने ‘छैय्या छैय्या’, ‘अनारकली’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ सारख्या सुपरहिट गाण्यांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. यासोबतच तिचा डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तसेच, मलायकाने ‘इंडिया गॉट टॅलेंट’ आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर’सारख्या शोमध्ये जज म्हणून काम केले आहे.

याव्यतिरिक्त मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत आणि वेळ मिळेल तेव्हा ते दोघे एकत्र वेळ घालवताना दिसतात. दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

हे देखील वाचा