Saturday, July 6, 2024

जणू भासे स्वर्गातील अप्सराच! ऑफ शोल्डर गाऊनमध्ये रॅम्प वॉक करत मलायकाने केले चाहत्यांना घायाळ

अभिनेत्री मलायका अरोरा कायमच सोशल मीडियावर तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी प्रकाशझोतात येत असते. सोशल मीडियामार्फत ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडली गेलेली असते. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टीं ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे फोटो खासकरून तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनत असतात. तिच्या चाहत्यांना देखील तिचे नवनवीन फोटो पाहायला खूप आवडतात. सध्या सोशल मीडियावर तिचा एक रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील मलायकाच्या अदांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

नुकताच बॉम्बे टाईम्स फॅशन वीक २०२१ पार पडला. यामध्ये मलायकाने देखील रॅम्प वॉक केला. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा लाँग आणि ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. यामध्ये तिने केसांना पांढरी रिबीन बांधली होती. तिने केलेल्या रॅम्प वॉकमुळे चाहत्यांची मने घायाळ झाली आहेत. अभिनेत्री यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. सध्या चाहते तिच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव करत आहेत. तिचा हा पांढऱ्या ड्रेसमधील एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजीचा वर्षाव केला आहे. या फॅशन वीकमध्ये रकुल प्रीत सिंग, दिव्या कुमार, दिया मिर्झा, शामा सिकंदर देखील झळकल्या होत्या.

मलायकाच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास ‘छैंया छैंया’ या गाण्यामधून तिला विशेष लोकप्रियता मिळाली. तिने आता पर्यंत ‘दिल से’, ‘मां तुझे सलाम’, ‘हे बेबी’, ‘ओम शांती ओम’, ‘वेलकम’, ‘हाउसफुल’, ‘दबंग’, ‘हाउसफुल २’, ‘दबंग २’, ‘हॅपी न्यू इअर’, अशा अनेक चित्रपटांमध्ये डान्सचा तडका लावलेला आहे.

साल १९९८ मध्ये तिने अरबाज खान बरोबर विवाह केला. त्यानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. परंतु सततच्या मतभेदांमुळे त्यांनी साल २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. सध्या तिचे नाव अर्जुन कपूर बरोबर जोडले जात आहे. साल २०१६ पासून ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघे सोशल मीडियावर देखील त्यांच्या प्रेमाविषयी बोलताना अनेकदा दिसतात. मलायका अर्जुन पेक्षा १४ वर्षे मोठी आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’

हे देखील वाचा