Thursday, March 12, 2026
Home बॉलीवूड ‘मी पँट घालायची…’, मलायकाने हॉटेलमध्ये घडलेला मजेशीर किस्सा केला प्रेक्षकांसोबत शेअर

‘मी पँट घालायची…’, मलायकाने हॉटेलमध्ये घडलेला मजेशीर किस्सा केला प्रेक्षकांसोबत शेअर

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराच्याबाहेर जायला देखील सगळ्यांना भीती वाटते. अगदी काही खरेदी करायला जाताना देखील शंभर वेळा विचार करावा लागतो. या विषाणूची भीती केवळ सामान्य जनतेमध्ये नाही, तर सेलिब्रेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणत दिसून येत आहे. अनेक कलाकारांनी कोरोनाशी लढा दिला आहे. तरीही आजही सगळ्यांच्या मनात भीती कायम आहे. अशीच भीती बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यामध्ये देखील दिसून आली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करून सगळ्यांसोबत एक किस्सा शेअर केला आहे.

मलायका ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ तिच्या फॅन्ससाठी शेअर केला आहे. यात तिने एक किस्सा शेअर केला आहे. कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर ती तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांशी कशाप्रकारे वागत असे आणि जेव्हा ती एका हॉटेलात बाथरूममधून आल्यावर तिला जाणवते की, तिने पँट नाही घातली.

मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “आधी जेव्हा आमच्या घरी पाहुणे यायचे, तेव्हा आम्ही म्हणायचो की, घाबरु नका आमच्या कुत्र्याला वॅस्किन दिले आहे. पण आता असं म्हणावं लागतं की, घाबरु नका आम्ही वॅक्सिन घेतली आहे.”

तिने दुसऱ्या स्टोरीमध्ये लिहिलेे की, “मी एका हॉटेलच्या बाथरूममध्ये गेले होते, तेव्हा मी माझ्या पायानेच टॉयलेट सिट उघडले. टिशू पेपरचा वापर केला. हात वैगरे धुवून मी घाई गडबडीत माझ्या टेबलवर परत आले, तेव्हा मला असे जाणवले की, मी पँट घालायची विसरले आहे.”

मलायकाने शेअर केलेला हा किस्सा सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. मलायका ही मागच्या वर्षी कोरोनाच्या विळख्यात अडकली होती. या गोष्टीची माहिती तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली होती. तिने सगळ्या गोष्टींचे नीट पालन करून कोरोनावर मात केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा