Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री मलायकाकडून चाहत्यांना होळीच्या कलरफूल शुभेच्छा! फोटो होतोय जोरदार व्हायरल

अभिनेत्री मलायकाकडून चाहत्यांना होळीच्या कलरफूल शुभेच्छा! फोटो होतोय जोरदार व्हायरल

होळीच्या निमित्ताने सगळे बॉलिवूड कलाकार वेगवेगळ्या अंदाजात होळी साजरी करतात आणि त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट करून प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या फोटोत तिने एक कलरफुल शोल्डर ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती सोफ्यावर स्टाईलमध्ये बसलेली दिसत आहे. तसेच केसांचा बन करून केस वर बांधले आहेत. मलायकाचा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.

मलायकाने तिचा हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा सुंदर फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “हॅप्पी होली.” तिच्या एका खांद्यावर गुलाबी रंग आहे. तिच्या या फोटोला आता पर्यंत 1 लाखांपेक्षाही जास्त जणांनी लाईक्स केले आहे. तसेच तिचे फॅन्स तिला कमेंट करून होळीच्या शुभेच्छा देत आहेत. मलायका सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकताच मागे तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती वर्कआऊट करताना दिसत होती.

मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या बॉलिवूड अभिनेता ‘अर्जुन कपूर’ सोबत डेट करत आहे. त्या दोघांना नेहमीच एकत्र पार्टीमध्ये स्पॉट केले जाते. मलायका अरोरा हिचे अरबाज खानसोबत लग्न झाले होते. 1998 मध्ये त्या दोघांचं लग्न झालं होत. पण 2017 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट घेतला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने केले ‘असे’ ट्वीट की झाला भलताच ट्रोल, नेटकरी म्हणालेे ‘ईदलाही हेच म्हणणार?’

-प्रेम हे! ‘हॅप्पी किस डे’ म्हणत प्रिन्सने केला पत्नी युविकाला किस करतानाचा फोटो शेअर; वेधले चाहत्यांचे लक्ष

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा