बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी खूप ओळखली जाते. अभिनेत्री बर्याचदा तिचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. फिटनेस संबंधित पोस्ट शेअर करून, ती अनेकदा चाहत्यांना निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करते. नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे, की ती तंदुरुस्त राहण्यासाठी या तीन गोष्टी करते.
मलायकाने क्रिमी कपसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने राखाडी रंगाचा नाईट सूट परिधान केला आहे आणि तिचे केस बांधलेले आहेत. हा फोटो शेअर करत मलायकाने लिहिले, “खरी टिप, दिवसाची योग्य सुरुवात, व्यायाम आणि स्वच्छ गोष्टी खाणे. तंदुरुस्त राहण्यासाठी या तीन गोष्टी आवश्यक आहेत. त्यापैकी कोणालाही कमी लेखू शकत नाही. परंतु आपणास काय वाटते, त्या तीनपैकी सर्वात महत्त्वाचे काय आहे?”
यापूर्वीही मलायकाने सोशल मीडियावर वर्कआउट करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, तुम्ही हे तीन व्यायाम करून घरी ऍब्स बनवू शकता. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, “तुम्ही हा व्यायाम 14 दिवस करा आणि मला परिणाम सांगा.”
सध्या 47 वर्षे वय असलेल्या मलायकाची तंदुरुस्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. या अभिनेत्रीने बर्याचदा सांगितले आहे की, ती फक्त फिट राहण्यासाठी व्यायाम करत नाही, तर त्याने तिला आनंद मिळतो. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीसोबतचा एक प्लँक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मलायका वेगवेगळ्या प्रकारचे प्लँक करताना दिसली.
हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की, “कोण म्हणतात की, प्लँक करण्यात मजा नाही.” इतकेच नाही तर मलायका तिच्या फिटनेस व्हिडिओमध्ये योग्यरित्या व्यायाम कसा करावा याबद्दल बोलते, त्याचबरोबर त्याच्या फायद्यांविषयीही माहिती देते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके










