फॅशनिस्टा आणि आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सतत आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे प्रक्षकांचे लक्ष वेधत असते. अर्जून कपूर सोबत नात्यामध्ये असल्या मुळे नेहमी ट्रोलर्स तिच्यावर टिका करत असतात. मात्र, अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान टीकाकरांना सडेतोड उत्तर दिलं आहे, ज्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आली आहे.
नेहमी आपल्या फॅशमुळे चर्चेत असणारी प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malayka Arora) हिने तिचा नवीन कार्यक्रम ‘मूविंग इन विद मलायका’ (Moving In With Malayka) यामध्ये तिने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल उघडपणाने वक्तव्य केले आहे. त्यासोबतच तिने ट्रोलर्सलाही चांगलाच धडा शिकवला आहे.
मलायका आणि अर्जून यांच्यामध्ये 12 वर्षाचा अंतर आहे, ज्यामुळे अभिनेत्रीला सतत ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. मात्र, यावर मलायकाने तिचा नवीन शो ‘मूविंग इन विद मलायका’ मध्ये सांगितले की, “दुर्दैवाने, मी केवळ वयाने मोठी नाही, तर माझ्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीलाही डेट करत आहे. म्हणजे माझ्यात हिम्मत आहे, मी त्याचे आयुष्य खराब करत आहे का? बरोबर म्हटलं ना? मला सर्वांना सांगायची इच्छा आहे की, मी त्याचे आयुष्य उध्वस्त करत नाही. असे नाही की तो शाळेत जात होता आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि मी त्याला माझ्या जवळ यायला सांगितले.”
View this post on Instagram
मलायकाने पुढे सांगितले की, जोव्हा कधी आम्ही डेटवर जातो तेव्हा असे नवी की,आम्ही क्लासेस बंक करुन जात आहोत. जेव्हा तो पोकेमॉन पकडत होता, तेव्हा मी त्याला रस्त्यावरून पकडले नाही. देवाच्या फायद्यासाठी तो मोठा झाला आहे आणि एक माणूस आहे. आम्ही दोघेही प्रौढ आहोत ज्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. जर एखादा मोठा माणूस लहान मुलीला डेट करत असेल तर तो एक खेळाडू आहे. पण जेव्हा एखादी मोठी मुलगी लहान मुलीला डेट करते तेव्हा तिला Cougar म्हणतात. हे चुकीचे आहे.’ मलायाकाचा हा राकयक्रम डिझनी प्लस हॉटस्टरवर प्रदर्शित होत आहेत. यालामध्ये अरबाज खान (Arbaj Khan) बद्दल वितारल्यावर मलायका भावनिक होताना देखिल दिसून आली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा प्रेमात! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला करतोय डेट
‘अशा भाषेत परत बोललात तर पोलीस तक्रार करेल कळलं?’, नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अमृता खानविलकर