Saturday, June 29, 2024

अर्जुन कपूरच्या गाण्यावर डान्स करतानाचा मलायकाचा व्हिडिओ व्हायरल, पुनित आणि सलमान यांचेही थिरकले पाय

बॉलीवूडमधील सुंदर अदाकारीने चाहत्यांना घायाळ करणारी मलायका अरोरा खूप दिवस झाले कोणत्याही चित्रपटात पाहायला भेटली नाही. मात्र, तरीही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग असते. मलायक नेहमी तिच्या फिटनेस, स्वॅग आणि नृत्याने चाहत्यांची ह्रदये जिंकून घेण्यात आघाडीवर असते. अशातच अभिनेत्री मलायकाचा एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अर्जुन कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

त्यामुळे या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मलायका अर्जुन कपूरच्या ‘इश्कजादे’ या चित्रपटातील ‘हुआ छोकरा जवां’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ज्यामधे मलायका सोबत सलमान, युसुफ खान आणि पुनित पाठक दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CHzMlaTBHi3/?utm_source=ig_web_copy_link

ग्रे कलरच्या गाउनमध्ये मलायका अधिकच खुलून दिसत आहे. त्याचबरोबर डान्स करतानाचे तिचे हावभाव सुद्धा खूपच लक्षवेधक आहेत. त्यामुळे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना भरपूर आवडला असून, त्यावर चाहते लाइक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. ज्या गाण्यावर मलायका गाण्यावर थिरकताना दिसत आहे, ते गाणे अर्जुन कपूरच्या 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘इश्कजादे’ या चित्रपटातील आहे. ज्यामधे अर्जुन कपूर सोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होती. त्याबरोबर गौहर खान सुद्धा या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होता.

अभिनेत्री मलायका अरोरा बाबतीत हे पहिल्यांदा घडलेलं नाही. जेव्हा मलायकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी मलायकाचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहेत. मलायका आपल्या डान्स बरोबर आपल्या फिटनेस बद्द्ल सुद्धा चर्चेत राहत असते . त्यामुळे अभिनेत्रींच्या फिटनेसवरून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे अवघड होवून बसते.

मलायका व्यावसायिक जीवनाशिवाय, अर्जुन कपूर सोबत नाव जोडले गेल्याने सुद्धा चर्चेत असते. कित्येकदा अर्जुन आणि मलायका एका ठिकाणी सोबत आढळून आले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा दोघे एकदुसर्‍या सोबत मजाक, मस्ती करताना दिसून येतात. परंतु मलायका आणि अर्जुन हे दोघेही या त्यांच्या नात्याला दोस्ती नाव देतात. तसेच अर्जुन म्हणतो की, तो ज्या कोणासोबत लग्न करेल त्याची माहिती मीडियाला नक्की देईल.

हे देखील वाचा