Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हा फॅशन शो नाही, पाऊस आहे’, म्हणत भर पावसात कुत्र्यासह रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणारी मलायका अरोरा युजर्सकडून ट्रोल

बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर दरदिवशी चर्चा रंगवते. ती खासकरून तिच्या फिटनेस आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. ती व्यायामाच्या बाबतीत खूपच गंभीर आहे. यासह, ती तिच्या कुत्र्यासोबत चालायला जाणे कधीही विसरत नाही, ज्यामुळे ती सतत पॅपराझींच्या कॅमेऱ्यात स्पॉट केली जाते. त्याच वेळी, चाहते देखील तिच्या नवनवीन फोटोंची प्रतीक्षा करत असतात. अलीकडेच मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मलायका अरोराला ‘तौक्ते’ वादळानंतर, मुंबईतील तिच्या घराबाहेरील रस्त्यावर तिच्या कुत्र्यासह फिरताना पाहिले स्पॉट करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अभिनेत्री रस्त्यावर चालत आहे. मग अचानक पाऊस पडतो आणि मलायका तिच्या पाळीव कुत्र्यासह घराकडे धावताना दिसते. त्याचवेळी मलायका आपल्या हातांनी पावसापासून डोके वाचवतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका खूप मजेदार पद्धतीने धावताना दिसत आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदोर ट्रोल होत आहे.

मलायकाच्या व्हिडिओवर कमेंट्स करत युजर्स तिची चेष्टा करत आहेत. यावर एका युजरने लिहिले आहे की, “जग इकडचं तिकडं होत आहे आणि यांना त्यांच्या कुत्र्यांसोबत फिरायचं आहे.” दुसरीकडे “हा फॅशन शो नाही, पाऊस आहे,” असेही म्हणत नेटकऱ्यांनी तिला बरेच ट्रोल केले आहे.

मलायका अरोराने यापूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वादळानंतरचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने बीएमसीला मुंबईतील रस्ते स्वच्छ करण्याचे आवाहन देखील केले होते. मलायकाच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर ती सध्या प्रसिद्ध टीव्ही शो ‘सुपर डान्सर ४’ मध्ये अनुराग बासू आणि कोरिओग्राफर गीता कपूरसोबत जज म्हणून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मलायका अनुराग बासूबरोबर धुनूची डान्स करताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

हे देखील वाचा