Wednesday, July 3, 2024

ब्रेकिंग! सिनेविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; जगभरातील चाहते शोकसागरात

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मल्याळम अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ यांनी वयाच्या 63 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 1991 मध्ये चेप्पुकिलुकन्ना चनागाथी या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने गुरुवारी कोची येथे अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, कलाभवन (Kalabhavan Hanif) यांना श्वसनाचा आजार होता, त्यामुळे त्यांना एर्नाकुलम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभरापासून या आजाराशी झुंज देत असलेल्या या अभिनेत्याचे गुरुवारी निधन झाले. या दु:खद बातमीमुळे उद्योगजगतात शोककळा पसरली आहे. कलाभवन हनिफ यांनी मल्याळममधील 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. हनीफ हा जूड अँथनी जोसेफच्या 2018: एव्हरीवन इज अ हिरोचा एक भाग होता, जो या वर्षीच्या ऑस्करसाठी भारताचा अधिकृत प्रवेश होता. त्यांच्या निधनानंतर कलाभवन त्यांच्या मागे पत्नी वहिदा आणि मुले सितारा हनिफ आणि शाहरुख हनिफ सोडून गेले आहेत.

कोचीजवळील मत्तनचेरी येथील रहिवासी असलेल्या हनिफने आपल्या मिमिक्री परफॉर्मन्सद्वारे टिन्सेल शहरात प्रवेश केला होता. केरळमध्ये मिमिंगची कला लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कलाभवन या प्रसिद्ध परफॉर्मन्स ग्रुपचे ते सदस्य होते. कलाभवनने ‘दृश्यम’, पंडीपाडा’, ‘छोटा मुंबई’, ‘उस्ताद हॉटेल’ आणि ‘2018’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांतून आपला अभिनय कौशल्य सिद्ध केला होता.

हनीफने अनेक चित्रपटांमध्ये पडद्यावर काम केले असले तरी, चित्रपटसृष्टीत त्यांना कधीही मोठी किंवा प्रमुख भूमिका मिळाली नाही. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा हनिफ यांना विचारण्यात आले की, तुम्ही यामुळे निराश आहात का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, मी कोणाकडूनही काही मागणी करत नाही. त्यांना कितीही वाईट वाटत असले तरी जे काही मिळाले त्यात ते आनंदी होता. (Malayalam actor and mimicry artist Kalabhavan Hanif passed away०

आधिक वाचा-
दीपिका पदुकोणचा ‘So Elegent…’ व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल , ‘टायगर ३’ च्या ट्रेलरपेक्षाही आले जास्त व्ह्यूज
‘टायगर 3’ रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचा बोलबाला, ऍडव्हान्स बुकिंगने केला 12 कोटींचा पल्ला पार

हे देखील वाचा