Friday, July 5, 2024

साऊथच्या अभिनेत्याकडून घृणास्पद कृत्य, लहान मुलींसमोरच झाला उघडा; पोलिसांकडून अटक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेता श्रीजीत रवी याला अटक झाली आहे. श्रीजीत याला अल्पवयीन मुलींसमोर न्यूडिटी दाखवल्यामुळे अटक करण्यात आली आहे. अभिनेता श्रीजीत हा दिग्गज अभिनेते टी. जी. रवी यांचा मुलगा आहे. त्याला कलम ११ अंतर्गत अटक झाली आहे. या कलमांतर्गत ११ पॉक्सो (लहान मुलांची लैंगिक शोषणापासून सुरक्षा) याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे कलम लैंगिक शोषणापासून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, ही घटना ४ जुलै रोजी थ्रिसुर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दोन अल्पवयीन मुली सोबत आल्या, तेव्हा श्रीजीत रवी (Sreejith Ravi) आपल्या कारमध्ये जाऊन बसला होता. अभिनेत्याने कथितरीत्या आपली गाडीच्या बाहेर पाऊल ठेवले आणि आपल्या नग्नतेचे प्रदर्शन केले. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी गाडीच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला. वृत्तामध्ये म्हटले गेले आहे की, श्रीजीत याच्यावर घटना आणि तपासादरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानेही मान्य केले की, त्याचे हे कृत्य योग्य नव्हते.

सन २०१६मध्येही अडकला होत्या अशाच गुन्ह्यात
श्रीजीत याची अशा प्रकरणात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. माध्यमांतील वृत्तानुसार, यापूर्वी काही वर्षांपूर्वी अशा प्रकरणात तो अडकला होता. माध्यमातील वृत्तानुसार, सन २०१६मध्ये श्रीजीत याला अटक करण्यात आली होती. यादरम्यान त्याच्यावर पलक्कड येथील १४ विद्यार्थीनींसोबत एका ग्रूपने सार्वजनिकरीत्या स्वत:ची नग्नता प्रदर्शित करण्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र, त्यावेळी त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटले होते. या प्रकरणी त्यांच्या पालकांनी पोलिसांवर आवश्यक पुरावे गोळा न करता तोडफोड केल्याचा आरोप केला होता.

श्रीजीतच्या कीरकीर्दीविषयी थोडक्यात
श्रीजीत याने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात २००५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मायुखम’ या सिनेमातून केली होती. त्याचवर्षी त्याला ‘चंथापोट्टू’ या सिनेमातून मोठा ब्रेक मिळाला होता. त्याने अनेक मल्याळम आणि तमिळ सिनेमात काम केले आहे. याव्यतिरिक्त त्याने ‘मिशन ९० डेज’, ‘पुण्यालन अगरबत्तीस’ आणि ‘पुण्यालन प्रायव्हेट लिमिटेड’ या सिनेमातही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

शॉकिंग! सलमान राहिला बाजूला, आता त्याच्या वकिलाच्या जीवावर उठलीय ‘ही’ टोळी; म्हणाली, ‘तुझाही गेम होणार’

पन्नाशीतही आहे शाहरुख खानची क्रेज कायम, ‘या’ अभिनेत्रीने केला प्रेमाचा खुलासा

एक तीर दोन निशाणे! ‘डॅडी’ मकरंद देशपांडे झळकणार ‘या’ प्रोजेक्ट्समध्ये, टाका एक नजर

हे देखील वाचा