गेल्या काही वर्षात सिने जगतात सर्वात जास्त ऐकलेला शब्द म्हणजे MeToo. मी टू अंतर्गत अनेक नायिकांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित रहस्ये उघड केली आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर आरोपही केले. पण अलीकडे पुन्हा एकदा MeToo हा शब्द ऐकायला मिळत आहे. या MeToo च्या वादळाने चित्रपट जगतात चांगलाच धुमाकूळ घातला होता. अनेक बड्या बड्या कलाकारांना या आरोपाचा सामना करावा लागला होता. आता हे वादळ शांत झालेले असतानाच, एका दाक्षिणात्य अभिनेत्याने हे प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की प्रसिद्ध तमिळ आणि मल्याळम अभिनेत आणि संगीतकार विनायकनने (Vinayakan) यांनी MeToo संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. विनायकन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘क्रूती’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र या प्रमोशनदरम्यान मी टूच्या मुद्द्यावरून तो असे काही बोलला की चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जेव्हा मीडियाने अभिनेत्याला MeToo बद्दल विचारले तेव्हा विनायकन म्हणाला, “MeToo म्हणजे काय? मला त्याची माहिती नाही. हे मुलीवर अवलंबून आहे का?” यावेळी विनायकन पुढे म्हणाला, “मला जाणून घ्यायचे आहे. जर मला एखाद्या महिलेसोबत सेक्स करायचा असेल तर काय होईल? मी माझ्या आयुष्यात १० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. मी त्या सर्व १० महिलांना विचारले होते की, त्यांना माझ्याशी शारिरीक संबंध ठेवायला आवडेल का? मी त्यांना यालाच मी टू म्हणतात का ते विचारेन, आजपर्यंत मला एकाही महिलेने विचारले नाही.” असे संतापजनक विधान केले आहे. या विधानानंतर विनायकनला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट टाकून आपला संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान अभिनेता आणि संगीतकार विनायकनला २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. यावेळी विनायकनने एकत्र झोपण्यास सांगितले, असा आरोप दलित कार्यकर्त्या मृदुला देवी यांनी केला होता. त्यावेळी त्या त्याला एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्या होत्या. मृदुलाने आरोप केला होता की, त्याला आपल्या आईकडुनही अशा अपेक्षा होत्या. या सगळ्या प्रकरणाने त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी मृदुला देवींना सोशल मीडियावर खूप पाठिंबा मिळाला. यानंतर इतर काही महिलांनी सोशल मीडियावर लिहिले की, विनायकनने त्यांच्यावरही अश्लील कमेंट केल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात अभिनेता विनायकची चांगलीच नाचक्की झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-