Monday, July 1, 2024

फहाद फासिलच्या सिनेमाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून गाजवली २ दशकं

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेत्री अंबिका राव यांचे सोमवारी (दि. २७ जून) निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांचे निधन हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे माध्यमांमध्ये सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना एर्नाकुलममधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना या लढ्यात त्या धारातीर्थी पडल्या. त्यांचे रात्री जवळपास १०च्या सुमारास निधन झाले. माध्यमांतील वृत्तानुसार, अंबिका राव यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तसेच, त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

अंबिका राव (Ambika Rao) या त्यांच्यामागे २ मुलांना एकट्या सोडून गेल्या आहेत. त्यांच्या मुलांची नावे राहुल आणि सोहन आहेत. मल्याळम अभिनेत्री अंबिका यांच्या निधनाने (Ambika Rao Death) दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुपरस्टार पृथ्वीराज यांनी अंबिका राज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “तुमच्या आत्म्याला शांती मिळो अंबिका.” याव्यतिरिक्त सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहेत. तसेच, त्यांना श्रद्धांजलीही वाहत आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, अंबिका राव यांनी सन २००२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कृष्ण गोपालकृष्ण’ या सिनेमातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन बालचंद्र मेमम यांनी केले होते. अंबिका यांनी जवळपास २ दशके सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अभिनेत्री म्हणूनही अनेक सिनेमात काम केले आहे. त्यांच्या सहाय्यक दिग्दर्शनात बनलेल्या सिनेमांमध्ये ‘मीशा माधवन’, ‘सॉल्ट अँड पेपर’, ‘कुंबलंगी नाईट्स’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तमाशा’, ‘वेल्लम’ यांचा समावेश आहे.

सन २०१९मध्ये अंबिका यानी ‘कुंबलंगी नाईट्स’ (Kumbalangi Nights) या सिनेमातून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या सिनेमातील त्यांच्या अभिनयासाठी सर्वांनी कौतुक केले होते. यामध्ये त्यांनी बेबी आणि सिम्मीच्या आईची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा