Tuesday, July 9, 2024

दुखद! बीग बॉसच्या माजी स्पर्धकाचा हृदयविकाराच्या झटक्याने ४२व्या वर्षीच मृत्यू, पेशाने होता गायक

मल्याळम गायक सोमदास चैतनूर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने दक्षिण चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्लम जिल्ह्यातील परापल्ली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमदा चैतनूर यांनी शेवटचा श्वास घेतला.

श्री. चैतनूर यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. लोकप्रिय गायक चैतनूर यांना काही काळापुर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची शेवटची चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतू यात त्यांना मुत्रपिंडाचा संसर्ग झाला होता. श्री चैतनूर यांनी शनिवारी पहाटे तीन वाजता अखेरचा श्वास घेतला.

अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत सोमदासने लोकांच्या हृदयात चांगले स्थान मिळवले होते. २००८ साली मल्याळम स्टार सिंगरमध्ये त्यांनी भाग घेतला होता. ते ही स्पर्धा जिंकू शकले नाहीत परंतू त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मल्याळम बीग बॉस २च्या सिझनमध्ये त्यांनी भाग घेतला होता. परंतू वैद्यकिय कारणामुळे त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला होता. त्यांना रक्तदाब, शुगरसारखे गंभीर आजार होते. त्यामुळे बीग बॉस व्यवस्थानपनाने त्यांना हा शो सोडण्यासाठी सांगितले होते. या शोमध्ये त्यांनी ‘Kannana Kanne’ हे कन्नड गाणे गायले होते. त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. तसेच आपल्या पहिल्या पत्नीची त्यांनी याच शोमध्ये माफी मागितली होती, त्यामुळे वाद निर्माण झाले होते.

रविवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे चैतनूर येथील घरी अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा