Monday, July 1, 2024

मल्लिका शेरावतने ‘मर्डर’ चित्रपटाची केली दीपिकाच्या ‘गेहराइया’शी तुलना; म्हणाली मी 15 वर्षांपूर्वी हेचं केलं होतं’

अभिनेत्री ‘मल्लिका शेरावत‘ (Mallika Sherawat) हीने बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. मर्डर, डबल धमाल, प्यार के साईड ईफेक्टस, अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. मल्लिका तिचा आगामी सिनेमा ‘आरके’ (RK/RKay) मधून परत मोठ्या पडद्यावर दिसनार असून, यासाठी ती पूर्णपणे तयार आहे. रजत कपूरच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमात, मल्लिकासोबतच कुब्रा सैत, राहुल बोस, रणवीर शौरी आणि मनु ऋषी चड्ढा हे देखील दिसणार आहेत. मल्लिका सध्या, या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्येच तिने दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) चित्रपट गेहराइया’ (Gehraiyaan) बद्दल जे बोलले आहे, त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

मल्लिकाचे म्हणने आहे की, सिनेसृष्टीतील एक विषेश भाग आहे, जो तिच्या ऍक्टिंग स्किल किंवा टॅलेंटवर नाही तर फक्त ग्लॅमर आणि बोल्डनेसवर लक्ष केंद्रित करतो. मल्लिका नुकतेच एका मुलाखतीत, केवळ आपल्या करिअरबद्दलच नाही बोलली तर, २००४ मध्ये आलेला तिचा चित्रपट ‘मर्डरची'(Murder) तुलना तिने, दीपिका पादुकोणच्या गेहराइयासोबत केली आहे. त्यासोबतच ती म्हणते की, दीपिकाने जे आत्ता केले आहे, ते मी १५ वर्षांपूर्वीच केलं आहे.

आरके या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सिनेसृश्टीतील बर्याच गोष्टींबद्दल मल्लिका बोलली आहे. यासोबतच तिने, स्क्रिप्टमध्ये आलेल्या बदलांवर आपले मत मांडले आहे. ती म्हणाला की, “आता महिलांसाठी लेखनात आनेक बदल आले आहेत, जे खूप चांगलं आहे. पूर्वी महिलांसाठी फक्त दोन प्रकारच्या भूमिका होत्या, एक म्हणजे चारित्र्यहीन आणि दुसरा सती सावित्री. पण आता काळ बदलला आहे. स्क्रिप्टमध्ये आलेल्या बदलांनी मी खुश आहे आणि दुखीही.”

मल्लिकाने, २००४ मध्ये आलेला तिचा चित्रपट मर्डरच्या दिवसांची आठवण काढली आहे. ती म्हणते की, “जेव्हा मी मर्डरमध्ये काम केलं होतं, तेव्हा मला प्रचंड टीका आणि नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. किस आणि बिकिनीबद्दल लोक वाट्टेल ते बोलायचे. दीपिका पदुकोणने जे गेहराईया या चित्रपटामध्‍ये केलं होतं, तेच मी १५ वर्षांपूर्वी केलं होतं. परंतु लोक तेव्हा खूप संकुचित मनोवृत्तीचे होते.मर्डर या चित्रपटात मल्लिका शेरावतने इम्रान हाश्मीसोबत काम केले होते.” या चित्रपटातील इम्रान आणि मल्लिका यांच्या बोल्ड दृश्यांची त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला नीतू कपूर देत नाही सल्ला, स्वतः सांगितले कारण..

‘वाणीला ढाल बनवत रणबीर स्वत:ची करतोय सुटका, की दुसरं काही?’, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा प्रश्न

कपड्यांवरुन ट्रोल केल्यावर मलायका अरोराने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

हे देखील वाचा