Saturday, March 15, 2025
Home साऊथ सिनेमा दुःखद! मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, सोशल मीडियावर अर्पण होतीये श्रद्धांजली

दुःखद! मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, सोशल मीडियावर अर्पण होतीये श्रद्धांजली

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे गुरुवारी (१७ फेब्रुवारी) रोजी हृदय विकाराच्या झटका येऊन मृत्यू झाला आहे. ते ६१ वर्षाचे होते. कोट्टायम प्रदीप यांचे असे आकस्मिक मृत्यू झाल्याने सगळेजण शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. पृथ्वीराज सुकुमार यांनी अभिनेत्याची मृत्यूची बातमी सोशल मीडियावर दिली आहे. गुरुवारी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांनी ज्युनिअर कलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली प्रदीप यांनी २००१ साली ‘आईवीससी’द्वारे दिग्दर्शित चित्रपट ‘ईईनडू इनले वरे’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. ‘विन्नैथंडी वरुवाया’, ‘आदु, वडक्कन सेल्फी’, ‘कट्टप्पनयिले ऋथिक रोशन’, ‘थोपिल जोप्पन’ आणि ‘कुंजिरमायणम’ या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

अभिनेत्याच्या अनेक चाहते तसेच कलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांचे नाव प्रदीप के आर हे होते. परंतु कोट्टायम प्रदीप म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांनी चित्रपटात जास्त करून विनोदी पात्र निभावले आहेत. त्यांनी आता पर्यंत जवळपास ७० चित्रपटात काम केले आहे. प्रदीप यांनी अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक झाले आहे.

 

हेही वाचा :

हे देखील वाचा