Wednesday, July 3, 2024

दाक्षिणात्य सिनेसृष्टी शोकसागरात! लोकप्रिय अभिनेत्याची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

सध्या दाक्षिणात्य सिनेजगतातील एका पाठोपाठ एक कलाकारांच्या मृत्यूंच्या बातम्या समोर येत आहेत ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी कन्नड अभिनेत्याच्या हत्येची बातमी ताजी असतानाच आणखी एका दाक्षिणात्य कलाकाराच्या मृत्यूने सिने जगतात खळबळ माजली आहे. मल्याळम चित्रपटांतील लोकप्रिय खलनायक एन.डी प्रसादच्या (N.D.Prasad) मृत्यूची बातमी समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. काय आहे ही संपूर्ण बातमी चला जाणून घेऊ. 

एन.डी प्रसाद हा मल्याळम सिने जगतातील लोकप्रिय खलनायक म्हणून प्रसिद्ध होता. अनेक छोट्या मोठ्या भूमिका तो साकारत असायचा. या तरुण अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एन.डी प्रसादने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. रविवार (२६ जून) रोजी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या बातमीने मल्याळम सिने जगताला मोठा धक्का बसला आहे.

एन. डी प्रसादने त्याच्या कोचीमधील राहत्या घराच्या आवारातच असलेल्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी हे धक्कादायक पाऊल उचलणाऱ्या एन.डी. प्रसादच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कौटुंबिक वादातून अभिनेत्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार याआधी एन. डी प्रसादला अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा