Friday, July 5, 2024

काय सांगता! करन-अर्जुनमधील शाहरुखची प्रेयसी झालीय साध्वी, बॉलीवूडला ठोकलाय कायमचा राम-राम

‘आशिक आवरा’ आणि ‘करण अर्जुन’ या चित्रपटातून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. आज ममताचा 49 वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 20 एप्रिल 1972 साली मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला आहे. गेल्या दोन दशकांपासून ममता चित्रपट सृष्टीपासून लांब गेली आहे आणि तिने आता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे एक पुस्तक देखील प्रदर्शित झाले होते. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही गोष्टी

ममताने 1991 मध्ये ‘ननबरगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1992 मध्ये तिने ‘तिरंगा’ या चित्रपटातून बी-टाऊन मध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1993 मध्ये आलेल्या ‘आशिक आवरा’ या चित्रपटाने ती नावारूपाला आली. फिल्म फेअर अवॉर्डमध्ये तिला या चित्रपटासाठी नवीन चेहरा अवॉर्ड याने गौरवण्यात आले होते. यांनतर तिने वक्त हमारा है, करण अर्जुन, क्रांतीवीर व बाजी या सारख्या चित्रपटात काम केले आहे. 2002 मध्ये तिचा शेवटचा ‘कभी तुम कभी हम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अनिल कपूर यासारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलेली ही अभिनेत्री त्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडली होती, जेव्हा तिने 1993 साली स्टारडस्ट मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. यासोबतच राजकुमार संतोषी यांनी तिला ‘चायना गेट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले होते. पण सुरुवताच्या काही वादांमुळे त्यांना ममताला चित्रपटातून काढायचे होते. परंतु नंतर अंडरवर्ल्डचा दबाव आल्याने त्यांनी तिला चित्रपटात ठेवले. हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतरच ममताने संतोषी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता.

एकेकाळी सगळ्यांना तिच्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजाने वेड लावणारी ममता कुलकर्णी आता साधू बनली आहे. तिने बॉलिवूडची वाट सोडून आता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. 2003 मध्ये तिने तिचे पुस्तक ‘ऑटोबायोग्रफी ऑफ एन योगिनी’ हे प्रदर्शित केले आहे. जेव्हा तिने चित्रपटसृष्टी सोडली तेव्हा तिने म्हंटले होते की,”प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कामासाठी जन्मलेला आहे. पण काही लोक ईश्वरासाठी जन्म घेतात आणि माझा जन्म ईश्वराच्या सेवेसाठी झाला आहे.”

हे देखील वाचा