Friday, November 22, 2024
Home मराठी नादच! ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ पाहण्यासाठी बुक केले संपुर्ण थिएटर, प्रसाद ओकने मानले आभार

नादच! ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ पाहण्यासाठी बुक केले संपुर्ण थिएटर, प्रसाद ओकने मानले आभार

प्रविण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित ‘धर्मवीर :मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पासूनच प्रचंड चर्चेत आला होता. त्यामुळेच चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड केले आहेत. चित्रपटातील प्रमुख अभिनेता प्रसाद ओकचे (Prasad Oak) सर्वत्र तोंड भरुन कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या लोकप्रियतेबद्दलची आणखी एक बाब समोर आली असून एका व्यक्तीने हा चित्रपट पाहण्यासाठी चक्क संपूर्ण थिएटरचं बूक केले आहे. याबद्दलची अभिनेता प्रसाद ओकची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

ठाण्याचे शिवसेना नेते आणि धर्मवीर या नावाने प्रसिद्ध असलेले आनंद दिघे यांच्यावरील धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा प्रविण तरडे दिग्दर्शित चित्रपट सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपुर्व प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सध्या प्रसाद ओकची यासंबंधीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने एका व्यक्तीने धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर एकट्यासाठी बुक केल्याचे सांगितले. आहे. प्रसाद ओकने हा व्हिडिओ शेअर करत आभारही मानले आहेत.

एकट्यासाठी संपूर्ण थिएटर बुक करुन चित्रपट पाहणारी व्यक्ती आहे धर्मराज फाउंडेशनचे आचार्य श्री धर्मवीर गुरूजी. धर्मवीर गुरूजींनी असे करण्याचे कारणही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की “मी आज एकट्याने हा चित्रपट पाहायचा ठरवला. कारण मी प्रसाद ओक यांच्या अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. याआधी त्यांनी माझ्या फाउंडेशनसाठी एक गाणे तयार करुन दिले होते. मला हा चित्रपट पाहताना कोणाचा गोंधळ, आवाज नको होता. मला फक्त चित्रपट एकट्याने पाहायचा होता. प्रसाद ओक यांचा अभिनय पाहायचा होता. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.”

दरम्यान प्रसाद ओक यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धर्मराज गुरूजी एकट्यानेच चित्रपट पाहताना दिसत आहेत. याबद्दल पोस्ट शेअर करत प्रसाद ओकने धर्मराज गुरुजींचे आभार मानले आहेत.

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा