Tuesday, July 9, 2024

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राला मिळाली मोठी संधी, लवकरच दिसणार मोठ्या पडद्यावर

झी मराठी या वाहिनीवर या वर्षी अनेक नवीन मालिका आल्या आहेत. सगळ्याच मालिका काहीतरी नवीन विषय घेऊन आल्याने प्रेक्षकांना देखील मालिका चांगल्याच भावल्या आहेत. अशातच ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मालिकेत महाराष्ट्राची क्रश अशी जिची ओळख आहे ती ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत अजिंक्य राऊत हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. त्याचा अभिनय देखील सगळ्यांना खूप आवडतं आहे. अगदी कमी कालावधीत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

अशाच अजिंक्यची चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आली आहे. ती म्हणजे अजिंक्य लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार अजिंक्यला एका चित्रपटाची ऑफर आली आहे. मालिकेतील त्याचे डॅशिंग परंतु तेवढीच प्रेमळ पात्र अनेकांना आवडत आहे. त्यामुळे आता त्याच्या आगामी चित्रपटात त्याचे पात्र काय असणार आहे ? तो कोणता चित्रपट असणार आहे? तसेच चित्रपटात आणखी कोण कोण कलाकार असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु अजूनही याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. (Man udu udu jhal serials ajinkya raut get bigg offer in movie)

परंतु अजिंक्यला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत अजिंक्य इंद्रा ही भूमिका निभावत आहे. तसेच ऋता ही दीपिका ही भूमिका निभावत आहे. त्यांची ही पात्रे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आता अजिंक्यला चित्रपटात बघण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. ऋता ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मोजक्याच मालिकांमध्ये काम केले आहे.परंतु तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तिने ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे.

हेही वाचा :

Apne 2 | मुलगा करणच्या दमदार पुनरागमनासाठी प्रचंड मेहनत घेतोय सनी देओल, काका बॉबी देओलही ‘या’ बाबतीत करतोय मदत

Controversy | जावेद अख्तर यांनी कंगना रणौतवर केली होती मानहानीची तक्रार, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने स्पृहा जोशीने तिच्या ‘खजिन्यातून’ घडवले आजच्या पिढीतील कवींचे दर्शन

 

हे देखील वाचा