Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘मैत्रीच्या नात्यात प्रेमाचा गोडवा’ शितली अजिंक्यची नवी लवस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला

‘मैत्रीच्या नात्यात प्रेमाचा गोडवा’ शितली अजिंक्यची नवी लवस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावरील लागीर झाल जी ही मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरुन प्रेम दिले. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शितलीची जादू मात्र कमी झालेली नाही. मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेली शितली म्हणजेच शिवानी बावकर सिने जगतात प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेतील तिच्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले होते. आता पुन्हा एकदा शिवानी बावकर (Shivani Baokar) नवीन कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अभिनेत्री शिवानी बावोकरने लागीर झाल जी मालिकेतुन मराठी मनोरंजन जगतात दमदार पदार्पण केले होते. या मालिकेतील शितलीच्या भूमिकेने तिला घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर शिवानी कुसूम या मालिकेतही झळकली होती. आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवानीचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. शिवानीच्या या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून ती लवकरच अभिनेता अजिंक्य राऊत सोबत पडद्यावर झळकणार आहे.

अजिंक्य आणि शिवानी  ही नवी जोडी लवकरच एका गाण्याच्या अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाते नव्याने असे त्यांच्या नव्या अल्बमचे नाव आहे. तर मैत्रीच्या नात्यात प्रेमाचा गोडवा अशी त्यांच्या या अल्बमची टॅगलाईन आहे. या बद्दलची सोशल मीडिया पोस्ट मनोरंजन मराठीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. तत्पुर्वी अभिनेता अजिंक्य राऊत सध्या मन उडू उडू झाल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेतील दिपू आणि इंद्राची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच पसंत येत असून इंद्राच्या भूमिकेतील अजिंक्यचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान आता शिवानी आणि अजिंक्यची फ्रेश जोडी पडद्यावर रोमांस करताना दिसणार असल्याने प्रेक्षकांनाही या अल्बमची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा