Friday, July 5, 2024

‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या शीर्षक गीताची झलक पाहिली का? व्हिडिओ तुफान व्हायरल

झी मराठी या वाहिनीत अनेक बदल घडून आले आहेत. ‘नव्या नात्यांच्या बांधू गाठी मी मराठी झी मराठी’ ही झी मराठी वाहिनीची नवीन टॅगलाईन आहे. यासोबत अनेक नवीन मालिका आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. यातीलच एक मालिका प्रेक्षकांचे चांगलेच आकर्षण ठरत आहे. ती मालिका म्हणजे ‘मन उडू उडू झालं’ होय. या मालिकेचे प्रोमो मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच या मालिकेच्या शीर्षक गीताची झलक देखील पाहायला मिळाली आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या शीर्षक गीताची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. यामध्ये ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतचा भन्नाट डान्स पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना त्यांचे हे शीर्षक गीत आणि त्यावरील डान्स खूप आवडला आहे. (Man Udu Udu Zalaya serial’s tital song viral on social media)

ऋताने या गाण्यावरील डान्स स्टेप्स करत सोशल मीडियावर या डान्स स्टेप करून झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करण्याचे चॅलेंज दिले होते. अनेकांनी या चॅलेंजला प्रतिसाद दिला होता. प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेत ऋताच्या पात्राचे नाव दिपाली, तर अजिंक्यच्या पात्राचे नाव इंद्रजित आहे.

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेचे शीर्षक गीत आर्या आंबेकर, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी यांनी गायले आहे. काही दिवसांपूर्वी अवधूत गुप्तेने तिघांचा फोटो शेअर करून आम्ही काहीतरी नवीन घेऊन येत आहोत, असे लिहिले होते. त्यांचे हे भन्नाट गाणे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. सगळेजण आता संपूर्ण गाण्याची वाट पाहत आहेत. ही मालिका ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पप्पी दे पप्पी दे पारुला’, म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या स्मिताचा ग्लॅमरस लूक आला समोर

-शिवानी बावकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; एकता कपूर करणार निर्मिती

-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

हे देखील वाचा