Saturday, July 6, 2024

मानसी अन् तिच्या पतीचा नवीन व्हिडिओ व्हायरल; साध्या वेशातील जोडपे, एका झटक्यात बनले मॉडर्न

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो शेअर करत असते. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती चित्रपटापासून जरा दूर आहे, परंतु तरी देखील तिने तिच्या चाहत्यांना अंतर दिले नाही. अशातच तिच्या पतीसोबत तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मानसीच्या पतीने अलीकडेच सोशल मीडियावर मानसीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती आणि तिचा पती प्रदीप खरेरा हे दोघेही अत्यंत साध्या वेशात असतात. तसेच मानसीच्या चेहऱ्यावर देखील खूप पिंपल्स आलेले दिसत आहेत. त्यानंतर ते दोघेही अत्यंत मॉर्डन लूकमध्ये दिसतात. त्या दोघांनीही काळ्या रंगाचा लायनिंगचा ड्रेस घातला आहे. (Manasi naik and her husband video viral on social media)

हा व्हिडिओ शेअर करून त्याने “कैसा लगा,” असे कॅप्शन दिले आहे. त्या दोघांचेही चाहते या फोटोवर त्यांच्या अनेक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना त्यांचा हा लूक खूप आवडला आहे.

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’मध्ये कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन? ‘या’ टीमला मिळाली सुवर्णसंधी

-गायत्री दातारच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ; कौतुक करत म्हणाले; ‘स्वर्गातील राणी’

-‘हा पुर्णविराम नाही, तर अर्धविराम…’, अभिनेत्री तेजस्वी पंडीतचे चाहत्यांना खास पत्र; जरुर वाचा

हे देखील वाचा