Wednesday, July 3, 2024

कुणीतरी येणार येणार गं! मराठमोळी मानसी नाईक होणार आई? फोटोमुळे रंगलीय एकच चर्चा

आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. आई होताना स्त्रीचा दुसऱ्यांदा जन्म होतो, असेही म्हटले जाते. यावर्षी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींना मातृत्व लाभलं आहे. ज्याच्या बातम्या आपण अनेकदा व्हायरल होताना पाहिल्या आहेत. पण आता या अभिनेत्रींच्या यादीत मराठमोळी मानसी नाईकही सामील होणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

होय! समोर आलेल्या मानसी नाईकच्या एका फोटोवरून, ती आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खरं तर मानसीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती फेक बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे. सोबतच तिने एका हातात कॅडबरी पकडली आहे, तर दुसरा आहे बेबी बम्पला लावला आहे. (manasi naik is pregnant? actress shared her photo with baby bump)

या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी पाहण्यासारखे आहे. विशेष म्हणजे, हा फोटो शेअर करत मानसीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “कमिंग सून.” अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. चाहत्यांकडून ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधला जात आहे. इतकेच नव्हे, तर नेटकऱ्यांनी हा फोटो पाहून, अभिनेत्रीला शुभेच्छा द्यायलाही सुरुवात केली आहे. मात्र हा एखाद्या आगामी प्रोजेक्टचा संकेत आहे का, अभिनेत्री खरंच आई बनणार आहे, हे येत्या काळातच समजेल.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा