Tuesday, July 9, 2024

‘बिवी नंबर वन’, मानसी नाईकने केला पतीसोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिलात का?

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो ती शेअर करत असते. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती चित्रपटापासून जरा दूर आहे, परंतु तरी देखील तिने तिच्या चाहत्यांना अंतर दिले नाही. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिच्या पतीसोबत तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मानसी तिच्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे. मानसीने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच सगळा साजशृंगार केला आहे. तसेच तिच्या पतीने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट घातले आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘बीवी नंबर वन’ हे गाणे लागले आहे. दोघीही व्हिडिओमध्ये जबरदस्त. डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. (Manasi naik share her dance video with her husband)

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मानसी नाईकने मागच्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

हेही वाचा :

अनेक चित्रपट फ्लॉप होऊनही उदय चोप्रा एवढ्या संपत्तीचा मालक, हे आहे त्याच्या कमाईचे साधन

टेलिव्हिजनवरील ‘या’ खलनायिकांचा सोशल मीडियावर जलवा, पाहायला मिळाला भन्नाट डान्स

अली फजलच्या पोस्टवर ‘वंडर वुमन’कडून प्रेमाचा वर्षाव, ‘या’ सिनेमात झळकणार एकत्र

 

हे देखील वाचा