Saturday, July 6, 2024

‘तुला पाहिले आणि…’ मानसी नाईकच्या लेटेस्ट फोटोवर पतीची लक्षवेधी कमेंट

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘आयटम गर्ल’ अशी जिची ओळख आहे ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा खूप वावर असतो. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या तिच्या काही फोटोंची जोरदार चर्चा रंगत आहे.

मानसी नाईकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये मानसी खूपच आकर्षक दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये तिने हातात मांजर घेतलेली आहे. नंतर तिने वेगवेगळ्या बोल्ड पोझ देऊन फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसीने लाईट ब्राऊन कलरचा ड्रेस घातला आहे. तसेच कानात मोठे ब्राऊन कलरचे इअररिंग्ज घातले आहे. तसेच तिने लावलेल्या ब्राऊन कलरच्या लिस्पटिकने ती खूपच आकर्षक आणि बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहे. यात खास गोष्ट म्हणजे, तिचा पती प्रदीप खरेरा याने देखील कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “मी तुझ्याकडे पाहिले आणि माझे उर्वरित आयुष्य मला डोळ्यासमोर दिसले.” (Manasi naik share her glamorous photos on social media, see her husband comment)

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईक ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने चित्रपटात आणि गाण्यात डान्स केला आहे. तिने ‘जबरदस्त’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘टारगेट’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘असं वाजवा की’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमध्ये डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा