Tuesday, June 24, 2025
Home मराठी तर ‘हा’ आहे मानसी नाईकच्या स्वप्नातला राजा; व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

तर ‘हा’ आहे मानसी नाईकच्या स्वप्नातला राजा; व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जिच्या नजरेच्या एका इशाऱ्याने ती समोरच्याला घायाळ करते. ती अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसीने अभिनयापेक्षाही डान्स करून तिचे नाव कमावले आहे. सध्या मानसी चित्रपटसृष्टीपासून जरा दूर आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मानसी विवाह बंधनात अडकली आहे. तरीही ती तिच्या चाहत्यांशी जोडून आहे. लग्नानंतर देखील ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या पतीसोबत देखील ती अनेक व्हिडिओ शेअर करत असते. अशातच मानसीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मानसीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसी ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला’ या मराठी गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मानसीने काळ्या आणि लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. यावर तिने हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. तिने गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली आणि सिंदूर लावला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या पतीचा फोटो देखील दाखवते. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही. प्रदीपरावांचा इंस्टाग्रामवर फोटो स्टॉक केल्याशिवाय पोरी राहत नाही.” तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सातत्याने सगळे या फोटोवर कमेंट करत आहे. तसेच तिच्या हातातील बांगड्या सर्वांना खूप आवडल्या आहेत. (manasi naik share her video on social media )

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने चित्रपटात आणि गाण्यावर डान्स केला आहे. तिने ‘जबरदस्त’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘टारगेट’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘असं वाजवा की’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा