अभिनेत्री मानसी नाईक हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ तसेच फोटो देखील ती वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच मानसीने तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मानसीने (manasi naik) नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती उदित नारायण यांच्या ‘दिल के बदले सनम’ या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. तसेच ड्रेसला मॅचींग गुलाबी रंगाचे एअरिंग घातले आहेत. या व्हिडिओमधील तिचे हावभाव तिच्या चाहत्यांचे मन चोरत आहेत. (Manasi naik share her video on social media)
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुम थोडा नजर अंदाज करके तो देखो, हम तुम्हे पहचान से इंकार कर देंगे.” तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिचा पती प्रदीप खरेरा याने देखील या फोटोवर “व्हेरी ब्युटीफूल,” असे लिहिले आहे.
मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.
हेही वाचा :
यामी गौतमच्या सस्पेन्स ड्रामा ‘अ थर्सडे’चा टीझर आला समोर, अभिनेत्री दिसली वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये










