Monday, July 1, 2024

‘वाट बघतोय रिक्षावाला’ फेम मानसी नाईकच्या नवीन व्हिडिओचा धुमाकूळ; एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीही म्हणाल, ‘व्वा!’

‘वाट बघतोय रिक्षावाला’ गाण्यामध्ये थिरकत मानसी नाईकने लाखो प्रेक्षकांच्या काळजावर वार केला होता. लॉकडाऊनच्या काळात इतर कलाकारांप्रमाणे, मानसी नाईकही सोशल मीडियावर आपला वेळ घालवत असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून अभिनेत्री चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलीकडेच तिने शेअर केलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडिओ मानसीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिचे मनमोहक असे एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. ‘अरे द्वारपालो’ या गाण्यावर मानसी अतिशय उत्तमरीत्या अभिनय करत आहे. तिच्या या व्हिडिओला नेहमीप्रमाणे चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. चाहत्यांव्यतिरिक्त अभिनेत्री दीपाली सय्यद आणि मानसीचा पती प्रदीप खरेरा यांनी व्हिडिओखाली कमेंट करून, तिचे कौतुक केले आहे.

अलीकडेच मानसी आणि प्रदीप खरेराच्या लग्नाला ४ महिने पूर्ण झाले. या निमित्ताने अभिनेत्री इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. ज्यात दोघेही लग्नविधी पार पाडताना दिसत होते. मानसी वधूच्या वेशात अतिशय सुंदर दिसत होती. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला. याशिवाय कमेंट करून या जोडप्याला अनेक शुभेच्छाही दिल्या.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

हे देखील वाचा