Tuesday, July 9, 2024

‘मोहब्बत कभी बुढी नही होती’, मानसी नाईक अन् तिच्या पतीला तरूणाईतच आलंय म्हातारपण!

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘आयटम गर्ल’ अशी जिची ओळख आहे ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडिया देखील तिचा खूप वावर असतो. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असतात. लग्न झाल्यापासून ती चित्रपटसृष्टीपासून जरी लांब असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी जोडून असते. तिच्या पतीसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना त्या दोघांची केमिस्ट्री देखील खूप आवडते. अशातच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मानसीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा पती प्रदीपसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही म्हातारे दिसत आहेत. त्यांनी तसा फिल्टर वापरला आहे. या व्हिडिओमध्ये प्रदीप म्हणतो की, “उमर चलती है कभी पुरी नही होती.” यावर मानसी म्हणते, “ये मोहब्बत है यारो कभी बुढी नही होती.” त्यांचा हा व्हिडिओ मानसीच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांच्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. (manasi naik’s video viral with her husband on social media )

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे. लग्न झाल्यांनतर मानसीच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. ती लग्नाच्या आधी जेवढी ग्लॅमरस दिसत आहे लग्नानंतर ती तेवढीच पारंपरिक लूकमध्ये दिसते.

मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने चित्रपटात आणि गाण्यावर डान्स केला आहे. तिने ‘जबरदस्त’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘टारगेट’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘असं वाजवा की’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा