अभिनेत्री मंदिरा बेदीने तिच्या कारकिर्दीची सुरूवात ‘शांती’ मालिकेपासून केली होती. तिने टीव्ही प्रस्तुतकर्ता अर्थात सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्धी मिळवली. ‘खतरों के खिलाडी’ या रियॅलिटी शोपासून ते बर्याच चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. वयाच्या या टप्प्यावरही मंदिराची तंदुरुस्ती चकित करणारी आणि सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. मंदिरा (१५ एप्रिल) रोजी तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ३० जून रोजी मंदिराच्या पतीचे राज कौशलचे निधन झाल्याने तिच्या यावर्षीच्या वाढदिवसाला दुःखाची किनार असणार आहे.
वयाच्या ५१ व्या यावर्षी देखील तिचा फिटनेस वाखाणण्याजोगा असून, ती अगदी तंदुरुस्त आणि स्टाईल, फॅशनच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही. मंदिरा बेदी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलसाठी बर्याचदा चर्चेत असते. आज आपण तिच्या फिटनेस सिक्रेटबद्दल आणि स्टाईलिंगबद्दल जाणून घेऊया.
मंदिरा बेदीचा जन्म १५ एप्रिल १९७२ रोजी कोलकाता येथे झाला. १९९९ मध्ये तिने राज कौशलशी लग्न केले. मंदिरा बेदी एका मुलाची आई असून, एक मुलगी तिने दत्तक घेतली आहे. परंतु तंदुरुस्तीच्या बाबतीत ती केवळ अल्पवयीन मुलींनाच नव्हे तर मुलांनाही मात देऊ शकते. तिने अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या व्यायामाचे व्हिडिओ शेअर करत असते.
मंदिरा बहुतेक वेळा तिचे फिटनेस सेशन शेअर करते, जे कोणत्याही जिम उपकरणांशिवाय घरी करता येऊ शकते. यासह, ती सतत तिच्या चाहत्यांना तंदुरुस्तीसाठी प्रेरित करताना पाहिली जाते.
मंदिराचे वर्कआउट सत्र असे आहे-
> प्रत्येक सेटसाठी एकूण कसरत वेळ – १०:३० मिनिटे
> एक सेट रिपीट व्यायामानंतर ३० सेकंदाचा ब्रेक
> वर्कआउट्सचे ६ सेट. प्रत्येक सेट दरम्यान २ मिनिटांचा ब्रेक.
प्लॅन १:
-१ मिनिट जंपिंग जॅक (१५ रिपीट)
-१ मिनिट इंच चालणे
-१ मिनिट जंपिंग जॅक
-शोल्डर रेज (१५ रिपीट)
-१ मिनिट इंच चालणे
-१५ साईड लॅटरल रेज
– १ मिनिट इंच चालणे
– १५ पुश-अप
प्लॅन २:
-१ मिनिट जंप स्क्वॅट
-१ मिनिट अल्टरनेट टो टच विथ डम्ब बेल्स
-१ मिनिट प्लँक जॅक
-१ मिनिट डाव्या खांद्याने डंबेल बेल स्क्वॅट
-१ मिनिट बर्पी विथ वर्टीकल स्टेप
-१ मिनिट उजव्या खांद्याने डंबेल बेल स्क्वॅट
-१ मिनिट अल्टरनेट स्क्वॅट
-१ मिनिटांच्या सिटिंग बेंचवर सीट अप
-१ मिनिट जंपिंग जॅक
-१ मिनिट काफ रेज एक्सरसाइज
मंदिरा बेदी स्वत: तंदुरुस्त आहेच, पण ती तिच्या चाहत्यांना देखील तंदुरुस्तीसाठी प्रेरित करते. ती सोशल मीडियावर बर्याचदा तिच्या फिटनेस सेशन्सचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- कॉलेजमध्ये सिनियर्सने रॅगिंग केले आणि कुणाल गांजावालाला सूर गवसला, वाचा त्याचा गायक होण्याचा प्रवास
- सलमान खानने केली चाहत्याची पंचाईत, केस कापण्याच्या बहाण्याने केले थेट टक्कलच व्हिडिओ झाला व्हायरल
- Ranbir & Alia Wedding | रणबीर-आलिया यांचा शुभविवाह संपन्न, कुटुंबियांच्या साक्षीने पार पडला सोहळा, पाहा Photo