मंदिरा बेदीने व्यक्त केलं दु:ख, केस कापल्यानंतर निर्माते देऊ लागले होते ‘अशा’ भूमिका

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सौंदर्याची, केसांची, स्मितहास्याची नेहमीच चर्चा रंगलेली असते. त्यामध्ये ९० च्या काळातील अभिनेत्रींची बाब तर काही औरच. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रत्येकालाच वेड लावले होते. यात मंदिरा बेदीचे (Mandira Bedi) नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. तिच्या सौंदर्याची त्याकाळात जोरदार चर्चा रंगली होती. याबद्दल तिने एक मोठा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

‘दिल वाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ चित्रपटातील नटखट मंदिरा बेदी सगळ्यांच्याच लक्षात राहिली. लांबसडक केस, स्मित हास्य यामुळे तिने सगळ्यांनाच प्रेमात पाडले होते. त्यानंतर तिने शांतीच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावरही चांगलीच धमाल केली होती. तिच्या कुरळ्या केसांची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. त्या काळात तिने याच लूकमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले. मात्र अचानक तिने आपला हा लूक बदलत छोट्या केसांमध्ये दिसायला सुरुवात केली होती. ज्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आता तिने याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला तिच्या लांब केसांनी सगळ्यांना मोहित केले होते. मात्र त्यानंतर तिने आपले केस छोटे केल्याने सगळ्यांनाच चकित केले होते.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

याबाबत खुलासा करताना तिने सांगितले की, ती कुरळ्या केसांना सरळ करून करून वैतागली होती. त्यामुळेच तिने केस कापण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने तिचा हेअर स्टायलिशही चकित झाला होता. त्याने तिला दोन तीन वेळा याबद्दल विचारलेही होते. आता तिची छोट्या केसांमधली स्टाइल सगळीकडे प्रसिद्ध झाली. मात्र याचा तोटा सांगताना ती म्हणाली की, जे तिला भूमिका देणार होते, ते द्यायचे बंद झाले होते. तिला सगळ्या नकारात्मक भूमिका मिळायला लागल्या होत्या. इतकेच नव्हे, तर तिला अनेकांना विग लावण्याचाही सल्ला दिला होता.

हेही वाचा –

Latest Post