Monday, July 8, 2024

अगदी कमी वयात ‘या’ अभिनेत्रींनी गमावलीय पतीची साथ, रेखा यांचाही आहे समावेश

बाॅलिवूडमधील विश्वात नेहमीच रंजक उदाहरणे घडत असतात. परंतू अनेकदा अशा काही घटना घडल्या आहेत की, ज्यामुळे प्रेक्षकही स्तब्ध झाले आहेत. बाॅलिवूडच्या काही अभिनेत्रींच्या पतीचे अचानक झालेल्या निधनानंतर त्या एकट्या पडल्या. परंतू त्यांनी स्वत:ची काळजी घेतली, तसेच कुटुंबाचीही काळजी घेतली. या अभिनेत्री स्वत:च्या कर्तुत्वावर यशाचा गाडा पुढे ओढत राहील्या. चला तर मग पाहूयात तरूण वयातील पतीची साथ नसतानाही स्वत:च्या कर्तुत्वावर पुढे गेलेल्या अभिनेत्री आहेत तरी कोण?

विजेता पंडित
प्रसिद्ध गायक आदेश श्रीवास्तव यांच्याशी अभिनेत्री विजेता पंडित यांचा विवाह झाला होता. मात्र, खूप कमी कालावधीत आदेश यांनी विजेता यांची साथ सोडली. २०१५ मध्ये आदेश यांचे निधन झाले. त्यावेळी विजेता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही त्या डगमगल्या नाही. त्यांनी स्वत: ची काळजी घेतली आणि आपल्या कुटुंबियांचा पाठिंबा घेऊन त्यांनी पुन्हा कामाला सूरूवात केली.

शांतीप्रिया
दिग्दर्शक राज सिप्पी यांच्या ‘सौगंध’ या चित्रपटात अभिनेत्री शांतीप्रिया यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी १९८७ साली तमिळ चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. शांतीप्रिया यांनी १९९९ मध्ये सिद्धार्थ रे यांच्यासोबत विवाह केला. मात्र, सिद्धार्थ यांचे २००४मध्ये वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा शांतीप्रिया ३५वर्षांच्या होत्या. विवाहानंतर शांतीप्रिया यांनी खूप कमी वेळात जोडीदार गमावला आहे.

मंदिरा बेदी
अभिनेत्री मंदिरा बेदीने १९९१मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिचा ‘दिलवाले दुल्हन ले जायेंगे’ प्रचंड प्रसिद्ध झाला. तिचे वय ४९ वर्षे आहे. नुकतेच २०२१मध्ये तिचा पती राज कौशलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राज जाहिरात चित्रपट निर्माता होते. त्याचा ३०जून रोजी अचानक झालेल्या निधनानंतर मंदिरा खूप दुखावली गेली. परंतू तिने स्वत:ला सावरत, सध्या ती कुटुंबातील सदस्यांसह मुलांचीही काळजी घेत आहे.

रेखा
दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेशसोबत अभिनेत्री रेखा यांनी विवाह केला होता. मात्र, खूप कमी कालावधीत त्यांच्या आयुष्यात दूरावा आला. आयुष्यातील वैद्यकीय गोष्टींना तसेच व्यावसायिक काही घटनांचा त्रास सहन न झाल्याने मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हा रेखा विधवा झाल्या. त्यावेळी रेखा ३५ वर्षांच्या होत्या. तरीही त्या मागे सरकल्या नाही. स्वत: च्या कर्तृत्वावर त्या पूढे जात राहिल्या.

लीना चंदावरकर


बाॅलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे लीना चंदावरकर होय. त्या अवघ्या २५ वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर लीना बर्‍याच काळ एकट्या राहील्या. दरम्यान, काही दिवसांनंतर किशोर कुमार यांच्याशी लिना यांनी मैत्री केली. त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह केला. परंतू लग्न झाल्यानंतर ७ वर्षांनी किशोर यांचा देखील मृत्यु झाला आणि त्या पुन्हा विधवा झाल्या. मात्र, आता त्या त्यांच्या मुलांसह सुखात जगत आहेत. तसेच त्या प्रसिद्धीपासून दूर राहतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार

हे देखील वाचा