Saturday, July 6, 2024

बाबो! तब्बल ३०० डान्सर घेऊन तयार केले ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटातील गाणे, शुटिंगला लागलेत ‘इतके’ दिवस

दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन या चित्रपटाची लोकांमध्ये सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाची कास्ट, कथा, ग्राफिक्स आणि बजेट यावर बरीच चर्चा होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. लोकांना ते खूप आवडत आहे. चित्रपटातील प्रत्येकाची भव्य भूमिका चाहत्यांना खूप आवडते. या चित्रपटाची कथा चोल साम्राज्याशी निगडीत असून त्यात नेत्रदीपक दृश्यांचा वापर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायने या चित्रपटात परिधान केलेल्या दागिन्यांविषयी सविस्तर माहिती दिली होती. आज आम्‍ही तुम्‍हाला या चित्रपटाशी संबंधित गाण्‍याची रंजक माहिती सांगणार आहोत.

बहुचर्चित पोन्नयान सेल्वन या चित्रपटाबद्दल असे  म्हटले जात आहे की हा चित्रपट भारतात बनलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा बजेट चित्रपट आहे. त्याचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच चित्रपटाची कथा 10व्या शतकातील चोल साम्राज्याची असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मणिरत्न यांनी आपला चित्रपट बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने भारताच्या विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर २०२१ मध्येच संपले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मणिरत्नम यांना या चित्रपटासाठी गाणे शूट करण्यासाठी 300 डान्सर्सची नियुक्ती करावी लागली. त्यापैकी 100 नर्तक फक्त मुंबईतून आले होते. हे गाणे शूट करण्यासाठी 25 दिवस लागले. त्याचा सेट खूपच भव्य होता आणि गाणेही भव्य आहे. सहा ते सात शेड्युलमध्ये गाणे पूर्ण झाले. लवकरच हे गाणे देखील प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, यात ऐश्वर्या राय, त्रिशा कृष्णन, विक्रम, जयराम रवी आणि कार्ती मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यावर्षी 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असून हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा