Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड मनीष पॉलने केला ‘जुग जुग जियो’चा अनुभव शेअर; म्हणाला, ‘डाउन-टू-अर्थ’ आहे वरुण धवन पण अनिल कपूर…’

मनीष पॉलने केला ‘जुग जुग जियो’चा अनुभव शेअर; म्हणाला, ‘डाउन-टू-अर्थ’ आहे वरुण धवन पण अनिल कपूर…’

‘जुग जुग जियो’ (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा २४ जून रोजी रिलीज झाला होता. या सिनेमामध्ये वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर ( Neetu Kapoor) यांच्या सह मनीष पॉल (Maniesh Paul ) आणि प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) हे देखील दिसले होते. या सिनेमामध्ये ‘मनीष पॉलने’ त्याच्या जबरदस्त एक्टिंगने प्रेक्षकांना अगदी खुश केलं होतं. सिनेमा रिलीज झाल्यानंतर मनीष पॉलने पहिल्यांदाच, वरुण धवन आणि कियारा आडवाणीबरोबर काम करण्यावर त्याचा अनुभव सांगितला आहे. अनिल कपूरसोबत काम करताना तो खूपच नर्वस होता आणि वरुणसोबत त्याने खूप मस्ती केल्याचेही सांगितले. मनीषने सांगितले की, “अनिल कपूर सारख्या दिग्गज व्यक्तीसोबत काम करताना मी नर्वस होतो. मी पहिलेही त्यांच्यासोबत एक शो होस्ट केला आहे पण, सिनेमामध्ये एकत्र काम करणं त्यापेक्षा बरंच वेगळं होतं.”

डाउन-टू-अर्थ आहे वरुण धवन:
पुढे वरुण धवनसोबत एकत्र काम करण्यावर मनीष बोलला की, “वरुण सोबतचा माझा अनुभव एकदम मस्त आहे. सेटवर आम्ही दोघांनी एकमेकांसोबत छान वेळ घालवला आहे. असं यामुळे झालं कारण वरुण एकदम डाउन-टू-अर्थ आणि चिल्ड-आउट व्यक्ति आहे. त्याने मला असं कधी वाटुच दिलं नाही, की त्याने खूप मोठे सिनेमे केले आहेत. तो जे करतो ते नेहमी एन्जॉय करतो.”

कियाराचा भाऊ बनला मनीष
मनीषने हे देखील सांगितले आहे की, सिनेमामधील त्याचा ब्रोमांस प्रेक्षकांना आवडत असल्याने, तो खूप खुश आहे. या सिनेमामध्ये मनीष, वरुण धवनचा मित्र आणि कियारा आडवाणीच्या भावाची भूमिका करणार आहे. जुग जुग जियो एक एंटरटेनर सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर उत्तम प्रदर्शन दाखवले आहे आणि अतापर्यंत ८० करोड इतकी कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘कब आयेगा मजा’ म्हणत सुमित राघवनने केले ‘आरे कारशेडवर’ विवादात्मक ट्विट

‘कब आयेगा मजा’ म्हणत सुमित राघवनने केले ‘आरे कारशेडवर’ विवादात्मक ट्विट

अर्रर्र! लग्नाच्या आधीच लागली हार्दिक अन् अक्षयाची भांडणं, लंडनच्या रस्त्यांवरच अभिनेत्रीने धरली कॉलर

हे देखील वाचा