Thursday, November 21, 2024
Home मराठी ‘मीच या घराची ‘सूत्रधार द बॉस’ म्हणत मंजिरीने कलात्मक पद्धतीने प्रसाद ओकला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘मीच या घराची ‘सूत्रधार द बॉस’ म्हणत मंजिरीने कलात्मक पद्धतीने प्रसाद ओकला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवरा आणि बायको हे एकाच गाडीचे दोन चाकं आहे. असे नेहमीच आपल्याकडे म्हटले जाते. एकमेकांवर विश्वास आणि साथ असेल तर त्यांचे नाते जागतिक सर्वात उत्तम नवरा बायकोचे नाते बनते. ज्या कलाक्षेत्राताबद्दल नात्यांना किंमत नाही असे म्हटले जाते, त्याच कलाक्षेत्रात असे काही नाती आहेत जे पाहून आपल्याला देखील त्यांचा हेवा वाटेल. अशीच एक जोडी म्हणजे प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांची. आज हे दोघेही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने मंजिरीने प्रसादासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे, जी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेता, दिग्दर्शक असलेल्या प्रसाद ओकने त्याच्या प्रतिभेने सर्वच रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मागच्यावर्षी त्याने ‘धर्मवीर’ सिनेमातून त्याच्या दमदार अभिनयाची अनुभूती सर्वांना दाखवली, तर ‘चंद्रमुखी’ सिनेमातून त्याने त्याच्या दिग्दर्शकीय पैलूंचे सर्वांना दर्शन घडवले. आता तो प्रभाकर पणशीकर यांच्या आणि निळू फुले यांच्या जीवनावर सिनेमा बनवत असून त्याबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

प्रसादच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच गाजताना आपण बघतो. मात्र आज प्रसाद नाही तर त्याची पत्नी असलेल्या मंजिरी ओकची पोस्ट जास्त गाजत आहे. मंजिरी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी प्रसादला शुभेच्छा देताना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “प्रिय प्रसाद ..९३ साली आपली खऱ्या अर्थानी “प्रेमाची गोष्ट “ सुरू झाली . अर्थात त्याआधी तू मला बराच काळ “अधांतर” ठेवलं होतंस. आणि त्यामुळे आपल्यामधे काही दिवस “रणांगण” तापलं होतं…पण हळू हळू “अशी बायको हवी” म्हणत तू “एकदा पहाव करून “ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही अस वाटणाऱ्या लोकांचा “भ्रमाचा भोपळा” फोडलास आणि शेवटी ही “साहेबजी डार्लिंग” झालीच. आणि “धन धना धन” असा आपला संसार सुरू झाला . तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना “बोल बेबी बोल” म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच “मी बबन प्रामाणिक “ आहे . पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची “ सूत्रधार द बॉस “ आहे अर्थात्त तुला ती संधी मी “ आलटून पालटून “ देत होते. ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची “नांदी”??? आपला पुण्याचा “वाडा चिरेबंदी “ सोडून आज २५ वर्ष झाली . पण तुझ्या बरोबर च्या अनेक सुख दुःखाची ही “ बेचकी” तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका “मग्न तळ्याकाठी ” च बसलीय असंच वाटतं . त्यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना “तू म्हणशील तसं” म्हणतच राहुयात. happy anniversary प्रसाद.” या पोस्टमध्ये तिने आजवर प्रसादने केलेल्या सर्व कलाकृतींची नवे अतिशय कलात्मक पद्धतीने वापरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

तिच्या पोस्टला उत्तर देताना प्रसादने लिहिले, “तूच होतीस “कच्चा लिंबू” तूच झालीस आपल्या मुलांची “हिरकणी” तूच आहेस माझी “चंद्रमुखी” असंच आनंदात जगू “हाय काय नाय काय”” सध्या या दोघाच्या पोस्ट तुफान व्हायरल होत असून, इंडस्ट्रीमधील त्यांचे मित्र आणि फॅन्स त्यांना शुभेच्छा देत आहेत.

तत्पूर्वी मंजिरीने प्रसादला त्याच्या प्रत्येक कामात पाठिंबा देत साथ दिली. प्रसादने अनेकदा मुलाखतींमध्ये मंजिरीमुळे तो एवढे यश मिळवू शकला असे सांगितले. शिवाय तो त्याच्या यशाचे श्रेय देखील तिला देत असतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट
बाबो! चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका ‘या’ वेब सीरिज

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा