Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘…इतका वाया गेलेला माणूस पाहिला नाही’, सुनील पालच्या या वक्तव्यावर मनोज बाजपेयींनी ‘या’ शब्दांत दिली प्रतिक्रिया

‘…इतका वाया गेलेला माणूस पाहिला नाही’, सुनील पालच्या या वक्तव्यावर मनोज बाजपेयींनी ‘या’ शब्दांत दिली प्रतिक्रिया

वाद हे फक्त मित्रमैत्रिणींमध्येच, नातेवाईकांमध्येच होतात असे नाही, वाद कलाकारांमध्ये देखील होतात. अनेक कलाकारांचे वाद मनोरंजनसृष्टीमधे खूप गाजले आहे. वाद म्हणजे मारामारी नाही तर शाब्दिक वाद आणि आजच्या काळात सोशल मीडियावर होणारे वाद. अनेकदा कलाकार सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर इतर कलाकारांवर काही टिपण्णी करताना दिसतात. याच टिपण्णीवरून वाद वाढत जातो.

सध्या इंडस्ट्रीमध्ये असच एक वाद चांगलाच गाजत आहे आणि तो म्हणजे अभिनेते मनोज बाजपेयी आणि कॉमेडियन सुनील पाल. सुनील पालने काही दिवसांपूर्वी मनोज बाजपेयींवर एक विचित्र कमेंट केली होती. या कमेंटवरून सुनील पाल मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील झाला होता. सुनील पालला मीडियाने पॉर्नोग्राफी केस संदर्भात प्रश्न विचारला. त्यावर तो म्हणाला, “डिजिटल प्लॅटफॉर्मला सेन्सरशिप नसल्याने लोकं याचा फायदा घेताना दिसत आहे.” मनोज बाजपेयी खूप मोठे अभिनेते असतील आणि त्यांना खूप पुरस्कार देखील मिळाले असतील, पण मी मनोज बायपेयी त्यांच्याइतका असभ्य आणि वाया गेलेला माणूस पाहिला नाही.” सोबतच त्यांची वेबसिरीज ‘फॅमिली मॅन’ला पॉर्न म्हणून सांगितले. यावर इतके दिवस मनोज बाजपेयींकडून कोणतेच उत्तर आले नव्हते, मात्र नुकतेच त्यांनी यावर त्यांचे मत मांडले आहे. (manoj bajpayee laughed at sunil pal comments on family man 2)

मनोज बायपेयीं यांना जेव्हा सुनील पाल यांच्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते जोरात हसायला लागले. म्हणाले, “मी अशा लोकंची मनस्थिती समजू शकतो, ज्यांच्याकडे सध्या काम नसून ते बेरोजगार आहेत. मी सुद्धा अशा परिस्थिती मधून गेलो आहे, त्यामुळे मी सर्व समजू शकतो. अशा मनस्थिती असणाऱ्या लोकांनी मेडिटेशन करावे.”

काही दिवसांपूर्वी मनोज बाजपेयी यांची ‘फॅमिली मॅन २’ ही सिरीज प्रदर्शित झाली होती. याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. नुकतेच ते नेटफ्लिक्सवर ‘रे’ सिनेमात दिसले. त्यांचा झी 5 वर ‘डायल१००’ हा सिनेमा ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा