प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात. काही अडचणी या आपण केलेल्या कर्मांमुळे आपल्या वाटेला येतात, तर काही अडचणींमध्ये आपल्याला ओढले जाते. या सर्वांचा मोठा आणि वारंवार आघात होत असताना जिद्दी आणि धीट व्यक्ती यावर स्वतःसाठी लढतात देखील. परंतु एक वेळ येते की, या सर्वांमुळे ती व्यक्ती पूर्णतः खचून जाते आणि टोकाचे पाऊल उचलते. असेच टोकाचे पाऊल उचलले आहे ‘मिस्टर इंडिया’ मनोज पाटील याने.
मनोज पाटील याने आपल्या आयुष्यातील अडचणींना कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्याने अभिनेता आणि इन्फ्लुएन्सर साहिल खानला दोषी ठरवले आहे. तसेच ओशिवारा पोलीस अधिकाऱ्याच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली गेली आहे. (Manoj Patil, who was Mr India, attempted suicide, in suicide note told Sahil Khan responsible, hospitalized)
साहिलवर त्याने सायबर क्राईम आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. सध्या त्याला मुंबईमधील कूपर रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो साहिलचे नाव घेत त्याने त्याच्या आयुष्यामध्ये किती अडचणी वाढवल्या आहेत हे सांगत होता. तो या व्हिडीओमध्ये म्हणाला की, “मी एक मध्यमवर्गीय आणि महाराष्ट्रीन कुटुंबातील आहे, तरी देखील मी माझ्या आयुष्यात एवढी प्रगती करतो आहे, हे त्याला बघवत नाही. गेले २ वर्षे तो मला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत आहे. त्याच्या त्रासाला मी खूप कंटाळलोय. तसेच तो माझ्या कुटुंबीयांना देखील त्रास देतो. माझ्या घरी माझी आई आणि बाबा आहेत. आज सकाळपासून मला खूप सारे फोन आणि मॅसेज आले आहेत. त्याने माझा नंबर व्हायरल केला आहे, पण आता मी त्याला सोडणार नाही.”
हा व्हिडिओ त्याने १२ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये पुढे तो म्हणाला होता की, “आज रात्री मी आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे. यामध्ये तुम्हाला मी सर्व काही ठोस पुराव्यासह दाखवणार आहे.” त्यानंतर त्याने १५ सप्टेंबरला देखील एक व्हिडिओ पोस्ट केला होता. “सामान्य माणसाबरोबर कधी पंगा घेऊ नका. कारण एक सामान्य माणूसच तुम्हाला प्रसिद्धी देऊन सेलिब्रिटी बनवत असतो.” असे तो म्हणाला होता.
यानंतर त्याने आणखी एका व्यक्तीचा व्हिडिओ त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती मनोज पाटीलच्या विरोधात बोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत मनोजने लिहिले होते की, “हा व्हिडिओ नीट कान देऊन ऐका. यामध्ये त्याला पाठीमागून कोणीतरी काय काय सांगत आहे. हा आहे ४८ वर्षांचा सुशिक्षित तरुण. हो हो माझा खरे पणा सगळ्यांसमोर आधीच आलेला आहे.”
इंस्टाग्रामवर अशा सर्व पोस्ट केल्यानंतर त्याने आता आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट
-अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’