Wednesday, April 17, 2024

मनोज तिवारींच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, मोठ्या मुलीनेच ठेवले छोट्या बहिणीचे नाव

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते, गायक आणि भाजपाचे नेते मनोज तिवारी नुकतेच बाबा झाले आहेत. त्यांना आणि त्यांच्या पत्नी सुरभी यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यांनीच ही आनंदाची बातमी ट्विट करून सर्वांना सांगितली होती. आता या नवीन बाळाचे नामकरण करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये या नवीन बाळाचा नामकरण संस्कार संपन्न झाला. मनोज तिवारी यांची मोठी मुलगी रिती हिने या बाळासाठी एक सुंदर नाव सुचवले होते. तेच नाव या नवीन बाळाला देण्यात आले आहेत.

रितीने तिच्या छोट्या बहिणीचे नाव ‘सान्विका’ ठेवले आहे. ‘सान्विका’ हे देवी लक्ष्मीचे नाव आहे. योगायोग म्हणजे मनोज यांच्या मोठ्या मुलीच्या रितीच्या नावाचा देखील अर्थ लक्ष्मी असाच होतो. मनोज तिवारी यांचे वैयक्तिक प्रसिद्धी प्रमुख (चीफ पीआर) शशिकांत सिंग यांनी याबद्दल माहिती दिली. या नामकरण समारंभात अनेक राजकीय आणि मनोरंजनातल्या लोकांनी हजेरी लावली होती. २०२० हे वर्ष सर्वांसाठीच त्रासदायक होते, मात्र याच वर्षाने जाताजाता मनोज यांना सर्वात बहुमूल्य भेट दिली.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.

मनोज यांनी पहिल्या पत्नीला दिलेल्या घटस्फोटानंतर ८ वर्षांनी मागीलवर्षी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच एप्रिल 2020 मध्ये सुरभी तिवारीशी लग्न केले. सुरभी मनोज यांची सेक्रेटरी होती आणि ती एक चांगली गायिका देखील आहे. मनोज यांचे पहिले लग्न अभिनयात येण्यापूर्वीच म्हणजे १९९९ साली राणी तिवारीसोबत झाले होते. त्यांनतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

मनोज यांनी त्यांच्या अभिनयाच्या काळात अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. २००४ साली आलेला ‘ससुरा बड़ा पइसावाला’ हा सिनेमा त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला.

मनोज तिवारी हे राजकारणातले मोठे नाव बनले आहे. त्यांनी उत्तरप्रदेश पासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर त्यांनी गोरखपूर वरून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ साली ते पूर्व दिल्लीमधून विजयी होते सांसद झाले. २०१९ निवडणूक देखील त्यांनी जिंकली.

हे देखील वाचा