Tuesday, July 9, 2024

मनोज तिवारींची एक्स पत्नी आहे ‘या’ गायकाच्या प्रेमात, रोमँटिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

भोजपुरी अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी यांची पहिली पत्नी रानी तिवारी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. रानी सध्या पंजाबी गायक एकम बावाला डेट करत आहे. नुकतेच रानीने तिच्या प्रेमाचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. त्यामुळे सर्वत्र तिची आणि एकमच्या प्रेमाची चर्चा सुरू आहे.

रानी आणि एकम अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एकमने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती एकमबरोबर दिसत आहे. एकम या फोटोमध्ये सेल्फी घेत आहे. या मध्ये त्याने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे, तर रानीने देखील गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघेही यामध्ये खूप खुश दिसत आहेत.

एकमने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक क्षणी प्रेम करण्याचे वचन आहे. प्रत्येक वेळी साथ देण्याचे वचन आहे. मी तुला विसरणार असे कधीच समजू नको, आपल्याला आयुष्यभरासाठी एकत्र राहायचे आहे. आय लव्ह यू माझी जान माझ्या हृदयाची धडकन.” एकम आणि रानीचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

एकम बावाने त्याच्या मनातील गोष्ट आधीच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, “प्रत्येक दिवशी प्रेमाला अनुभवणे ही चांगली गोष्ट आहे. तिच्याबरोबर असण्यासाठी मी देवाचे खूप आभार मानतो.”

साल १९९९ मध्ये मनोज तिवारी आणि रानीचा विवाह झाला होता. त्यांना जिया नावाची एक मुलगी देखील आहे. १४ वर्षे हे दोघे एकमेकांबरोबर राहिले. त्यानंतर मतभेद होऊ लागल्याने त्यांनी साल २०१२ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर मनोज यांनी सुरभी तिवारीबरोबर विवाह केला. या दोघांनी नुकतेच एका मुलीला जन्म दिला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

-भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

-Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

हे देखील वाचा