Wednesday, July 3, 2024

‘१ सेकंड.. वो तो अपने टीम का..’ रामलीलामध्ये अंगद बनलेल्या मनोज तिवारींचा संवाद ऐकून तुम्ही पोट धरून हसाल

प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोद्धेत नवरात्री निमित्ताने रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते. अयोद्धेतील ‘लक्ष्मण किला’ या ठिकाणी आयोजित केलेल्या या नाट्यात अनेक नेते आणि अभिनेत्यांनी अभिनय केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच इतके मोठे नाट्य नऊ दिवस प्रेक्षकांशिवाय सादर करण्यात आले.

दिनांक १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ही रामलीला सोशल मीडिया आणि यूट्यूबद्वारे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली गेली. या रामलीलामध्ये भाजप खासदार मनोज तिवारी यांनी देखील अभिनय केला आहे. मनोज तिवारी यांनी यात ‘अंगद’ची भूमिका साकारली होती. ज्यात अभिनेते मनोज यांनी एक संवाद बोलताना थेट इंग्रजी शब्दांचा वापर केला. त्यांचा हा संवाद आता प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहणार आहे.

‘१ सेकंड.. वो तो अपने टीम का..’ आणि मनोज तिवारी होऊ लागले ट्रोल

‘रामलीला’मध्ये एका प्रसंगात मनोज तिवारी यांचा रावणाचे पात्र साकारलेल्या शाहबाज खान यांच्यासोबत संवाद होता. ज्यात त्यांनी रावणाशी म्हणजे शाहबाज खान, यांच्याशी बोलताना ‘एक सेकंड.. एक सेकंड’ असे म्हटले आहे. तसेच, पुढे थोड्यावेळाने ‘वो तो अपने टीम का बंदर..’ असेही म्हटले.

हा संवाद ऐकल्यानंतर अनेकांनी या संवादाचे रेकॉर्ड व्हिडिओ फुटेज समाजमाध्यमावर पोस्ट करुन अंगद बनलेल्या मनोज तिवारींना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. तसेच हा व्हिडिओ देखील आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, हा व्हिडिओ पाहून ‘दैनिक बोंबाबोंब’चे प्रेक्षक देखील पोट धरुन हसतील.

खरे तर, ‘१ सेकंड’ आणि ‘हमारे टीम का बंदर’ ही वाक्ये रामायणात आपण कधी ऐकू असे कोणालाच वाटणार नाही. परंतू, अयोद्धेत नवरात्री निमित्ताने झालेल्या रामलीलामध्ये प्रेक्षकांना असा संवाद ऐकायला मिळाला. मनोज तिवारी यांसारख्या दिग्गज अभिनेत्याकडून झालेली ही चुक असल्याने समाजमाध्यम वापरकर्तेही त्यावर चांगलेच व्यक्त होत आहेत. तसेच, मनोज तिवारी देखील आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागले आहेत. अनेकांनी तर हा हिंदीचा अपमान असल्याचा टोला लगावला आहे.

हे देखील वाचा